google-play Create Biodata For Free

पसंती तुमची … आनंद आमचा.

प्रेम विवाह असतो तेव्हा आधी … मन जुळतात … प्रेम होते …. नंतर लग्न हा एक सोपस्कार राहतो . परंतु वडीलधाऱ्यांच्या संमतीने केलेल्या विवाहात आधी ‘ लग्न सोहळा’ पार पाडतो . नंतर सतत सानिध्यात आल्याने एकमेकांचे गुण अवगुण

समजून घेत , वेळ प्रसंगी समजूत काढत …. संसार सुरू होतो . हळूहळू प्रेम फुलू लागते तसा संसार बहरू लागतो . सुखी संसारासाठी एकमेकांच्या प्रेमात असणं पुरेस नसतं. गरज असते ती एकमेकांना समजून घेण्याची . आयुष्याचा जोडीदार निवडतांना आवडीनिवडी जुळतात का? हे बघतांना …. खरं तर एकसारखे स्वभाव असण्यापेक्षा … एकमेकांना सामावून घेणारा स्वभाव असणे अत्यंत गरजेचे आहे. दोघंही रागीट असतील तर एकाने रागवल्यावर दुसऱ्याने समजूत काढण्याची मजा हरवून जाईल. दोघांनाही खर्च करण्यात आनंद येत असेल तर सुरक्षित भविष्याची तरतूद कोण करेल??

दोघंही मनाने हळवी असून चालत नाही कारण जेव्हा कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल तेव्हा एकाने दुसऱ्याला सावरायला हवं . आपण आपल्या आजूबाजूला अनेक उदाहरणं बघतो की दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकत्र येऊन खूप सुखाचा संसार करतात. ” Opposite attracts” या उक्तीला सार्थ असंच त्यांचं वागणं असतं.

तेव्हा एकमेकांचे स्वभाव जाणून घेवून …. आपल्याला योग्य अशा साथीदाराची निवड करण्यास ‘ स्थळ ‘ तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध करून देते . तुमची निवड …. योग्य की अयोग्य हे पडताळून पाहण्याचे स्वातंत्र्य देते . तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा आदर करते ….. कारण …. “लग्न हा व्यवहार नसून नवीन जीवनाचा प्रारंभ आहे” असे ‘स्थळ ‘ मानते. तुम्हाला तुमचे निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देत केवळ योग्य निर्णयापर्यंत पोहचण्यासाठी मदत करणारे एक उत्तम साधन म्हणून ” स्थळ ” काम करते.

तेव्हा वेळ घालवू नका …. निश्चिंत मनाने स्थळला एकदा भेट द्या

आम्ही_लग्नाळू

मामे भावाच्या लग्नात डीजे वर गाण लागलं , ” आम्ही लग्नाळू ” . सगळेच या गाण्यावर नृत्य करत होते पण राहुल मात्र कोपऱ्यात उभ राहून गंमत बघत होता. रेड्याला मिळतात म्हशी बी लई अन् गाईला मिळतात वळू …. या वाक्यावर त्याच्या मनात लग्नाविषयीच्या विचारांनी गर्दी केली.

गेले दोन वर्ष तोही कांद्यापोह्यांच्या कार्यक्रमाला जात होता. पण एकही मुलगी त्याला बायको म्हणून मनात भरली नाही. काही मुली आवडल्या तेव्हा त्यांच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा जुळत नव्हत्या. तो या सगळ्यामुळे वैतागला होता.

समाज कितीही बदलला तरी ‘ लग्न ‘ या विधीला आजही महत्त्व दिलं जातं. अनेक सिनेमामधे त्यांचे सुंदर दर्शन घडते. लहानपणापासून आपण आपल्या अवतीभोवती काय बघतो यापेक्षा सिनेमामधे लग्ना विषयी जो डोलारा उभा केला जातो त्याचीच आपल्या मनाला भुरळ पडते. आपण आपल्या लग्नाविषयी अनेक अशा अपेक्षा बाळगतो ज्यांची प्रत्यक्ष आयुष्यात फारशी गरज नसते. आयुष्य सुखी समाधानी व्हावे अशी अपेक्षा असेल तर लग्नातील दिखाव्यापेक्षा जोडीदार समजुतदार मिळायला हवा. पण घडते सगळे उलटेच. केवळ यंदा कर्तव्य आहे म्हणून मागचा पुढचा कोणताही विचार न करता अनेक स्थळे सुचवली जातात .

एकदा भेटून , चार प्रश्न विचारून नक्की स्वभाव कळतं नाही. फक्त अंदाज बांधता येतो. बांधलेल्या अंदाजावर पुढचे सगळे आयुष्य काढायचे म्हणजे महा कठीण काम. त्या परिस्थितीत आपल्यालाच नेमक कळत नसतं की आपल्या अपेक्षा नक्की काय आहेत . आपण फक्त आपल्या मनाच्या आवाजावर अवलंबून असतो . अनेकदा अपेक्षा जुळल्या तरी काही कारणाने गोष्टी पुढे जात नाही. या सगळ्याचा मनावर ताण येतो . त्यातून अपेक्षांमधे अनेक बदल आपण करत जातो तरी परिस्थिती तीच राहते.

रेड्याला कोणतीही म्हैस चालेल पण आपलं तस नाही . पूर्ण आयुष्य जिच्या संगतीने घालवायचे आहे तिलाही आपण पसंत पडायला हवं . तेव्हाच तर आयुष्याची आनंदी सुरवात करता येईल. गाण्यात म्हणायला काय जात कोणाचं प्रत्यक्षात केवळ लग्न करायचं आहे म्हणून कोणत्याही मुलीशी लग्न करायला आपल्याला अजिबात जमणार नाही .

त्याचे विचार सुरूच होते. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला . त्याची विचारशृंखला भंगली. त्याने मागे वळून पाहिले तर त्याचाच मामा त्याच्याशी बोलायला आलेला.

मामाने त्याला चिडवायचे म्हणून म्हंटले , ” नाचून घे रे मस्त …. एकदा का लग्न झालं की बायकोला विचारल्याशिवाय काही करता येणार नाही “. तो चटकन् बोलून गेला ,’ नंतर नाचता येईल की नाही माहीत नाही . सध्या जोडीदार मनासारखी मिळत नाही त्याच काय ?’

मामा लगेच म्हणाले,” अरे ‘स्थळ ला एकदा नक्की भेट दे . आम्हाला मिळाली तशी तुलाही तुझ्या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळतील. तुझ्या पंसतीचे अनेक पर्याय मिळतील . निवडलेला पर्याय काही कारणाने चुकीचा वाटला तरी *स्थळ* तुझ्या निर्णयाचा आदरच करते . तुझ्यावर कोणतीही सक्ती न करता इतर पर्याय सुचविले जातात . तेव्हा सगळ्या चींता सोडून दे आणि डीजेचा आनंद घे “.

मामाचे म्हणणे राहुललाही पटले . निवांत वेळ मिळताक्षणी सगळ्यात आधी ‘ स्थळ ला भेट देण्याचं त्यांनी मनोमन पक्क ठरवलं. ” आवाज वाढव डिजे तुला आईची शपथ आहे ” या गाण्यावर त्यानेही मग बेफिकर होवून ताल धरला.

स्थळ – आता सर्व मराठी समाजासाठी

“अगं मीनल 3 वर्ष झाली तुझ्या लग्नाला, पण अजूनही 3 वर्षांपूर्वीचं प्रेम तसंच दिसतंय गं चेहऱ्यावर…” मीनल मनोमन लाजली.. “काहीतरीच हा तुझं…” “काहीतरी नाही गं, मी खूप जोड्या पाहिल्या…6 महिन्यातच इतकी वैतागलेले दिसून येतात की बस्स….ए सांग ना…क्या सिक्रेट है इस सदाबहार प्यार का….”

एका मैत्रिणीच्या लग्नसोहळ्यात मीनल आणि रश्मी एकत्र भेटतात, त्यांच्यात हा संवाद रंगलेला असतो…इतक्यात मीनल चा नवरा मीनल जवळ येतो आणि म्हणतो… “जा तू जेवून घे बरं आधी, जेवायची वेळ चुकली तर ऍसिडिटी होते तुला…” असं सांगत तो तिथून निघून जातो… “हाय मैं मर जावा…काय हे प्रेम…इतक्या गर्दीत सुद्धा त्याला तुझी काळजी…कुठे भेटला गं हा…” “रश्मी आता लाजवू नकोस गं अजून..आहेच माझा नवरा लाखात एक…आणि हा भेटला स्थळ मॅट्रिमोनी वर…” “स्थळ मॅट्रिमोनी?”

“हो…आयुष्यभर साथ निभवायची असेल तर एकमेकांबद्दल सत्य माहिती मिळायला नको? आणि स्वभाव जुळणं..rather एकमेकांना समजून घेण्याची तयारी असणं, एकमेकांची काळजी असणं महत्वाचं…आणि हे match making घडवून आणलं स्थळ ने..जिथे माझ्या स्वप्नातला राजकुमार मला मिळाला…” “भारीच गं… पण…आमच्या समाजामध्ये फार कमी लोकं आहेत… मिळेल का मला असा अनुरूप जोडीदार?”

“अंग स्थळ मॅट्रिमोनी आता सर्व मराठी समाजासाठी खुले झाले आहे…अगदी निर्धास्तपणे शोध तिथे…” अगं मीनल जेवली नाहीस अजून? आणि काय हो रश्मी मॅडम..तुमचं यंदा कर्तव्य आहे की नाही??” “जीजू…तुम्हाला भाऊ आहे का हो एखादा??” “भरपूर आहेत…स्थळ वर सगळे मिळतील…” “तुम्ही चला पुढे, मी येते मागून जेवायला” “काय करणारेस तू आता?” “स्थळ वर रजिस्ट्रेशन….”

MAKING HAPPY HALLUCINATIONS REAL

To understand Happy Hallucinations, we need to begin with a simple question. How many times you can’t stop yourself from imagining your life partner? Imagining life after marriage? And for some, it goes to the extent of imagining their children too. So, Why do we have such Happy Hallucinations? Because Sometimes we completely reject the idea of marriage and challenge it’s worthiness and later we find ourself swaying once again in those Hallucinations.

But some questions still hit hard on us. why marry? simply because every one of our age does or have to because of social enigma or it’s just a fear of being alone? Now to understand this, you need to travel ahead in time. You are now an old man, walking down the street in the beautiful morning. Leaves falling off the trees as the wind blows swiftly around- a place from your dreams. As you walk slowly, you suddenly realize you have seen a lot throughout your life, up & downs, emotional torrents and joyful moments. But the moment you look back you find that there was nobody beside you throughout this journey. You might have seen the world with your wise perspective, but to see this world through someone else’s eyes is what you missed. Now, Do you feel that regret?

Now let’s simply put this, Even when we all have different opinions on Marriage and whether you like this timeless concept or not , you will agree that there is something within us which tends to fall for it. Now and then, irrespective of our rational or irrational views on marriage, we do think about it and enjoy those Happy Hallucinations. Now, the moment you explore what is it within you that sees beauty in the concept of marriage, you have got it! You have solved the puzzle! And it’s time to move from Happy Hallucinations to a Happy Reality. Once you realize this don’t be confused or panic about what next….there’s Sthal Matrimony. Leave the worries and begin your partner hunt with Sthal

SthalTales #Story5

विलास साहेब व त्यांच्या सौ किचनमध्ये सकाळच्या ब्रेकफास्टच्या वेळी बोलत होते…”हे बघ , मी उद्या ऑफिसला सुट्टी टाकून , आदित्यसाठी मुलींची स्थळे पहायला आपल्या नजीकच्या चौकातील त्या विवाह संस्थेत जाणार आहे.त्याचं रजिस्ट्रेशन करूनच टाकतो एकदाचं ….पुन्हा उशीर व्हायला नको….!!!” विलास साहेब त्यांच्या पत्नीला उद्देशून सांगत होते.

त्यावर सौ ने सांगितले , “अहो , सकाळी लवकरच निघा , मी ऐकून आहे तिथे खूप वेळ लागतो खूप थांबावं लागतं , आपली सगळी माहिती लिहून घ्यायला , त्यानंतर त्यांच्या भल्यामोठ्या रजिस्टर मधून आपल्या क्रायटेरिया मध्ये येणारी स्थळ शोधून ते देतात…….

जवळच आदित्यची बहिण श्वेता नाश्ता करत होती….तिच्या कानावर हे संभाषण आलं ती त्या दोघांना पाहात म्हणाली , “पप्पा ,मम्मी चिल…!!! का टेन्शन घेताय इतकं ?…आजकालच्या ऑनलाइनच्या काळात काय हे घेऊन बसताय ?…….ऑनलाईन वेबसाईट वर आपण दादाचं प्रोफाइल रजिस्टर करुयात ना !!……

त्यावर आई म्हणाली,”तुला नाही कळणार, एक तर तो मोबाईल मला नीट हाताळता येत नाही मग मी कसं करणार ऑनलाईन काहीही ? तुझ्या बाबांना देखील जास्त कळत नाही त्यातलं…..आम्हाला सारखं तुमच्या मागे फिरावे लागेल हे सांग , ते सांग……

श्वेता हसत म्हणाली , “अगं , एकदम सोप्प आहे ! मी ऐकले “स्थळ” “मॅट्रिमोनी” बद्दल ती माझी एक मैत्रीण आहे ना तिचे मामा सांगत होते त्या दिवशी “, बोलता बोलताच श्वेताने नेट ऑन केले स्थळ पोर्टल ओपन करत म्हणाली , “आई , दादा ची सगळी माहिती मी एकेक करून भरते”…दहा ते पंधरा मिनिटातच ती म्हणाली “झालं पण ,….आई , बाबा तर पाहतच राहिले ….

आता प्रश्न होता की श्वेता नसताना आईने तिथे लॉगिन करून स्थळ कशी पाहायची कुठे आणि कसं ऑपरेट करायचं ?……

अशी कन्फ्युजनची सिच्युएशन झाली होती……श्वेता हसत आईच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली ,”डोन्ट वरी डियर, “स्थळ” असेल तर सगळ सोप्पं असेल कारण ते जाणतात तुमचे प्रॉब्लेम्स”….

“हे बघ , तू त्यांच्या कस्टमर केअर ला कॉल कर, तुला काहीच नाही समजलं तर, ते तुला योग्य ते मार्गदर्शन , तुला सोईस्कर अशा रूपात करतात”

……दुसऱ्या दिवशी विलास साहेबांनी “स्थळ : ए्क्लुसिव मराठा मॅट्रिमोनी ॲप” वरूनकाही स्थळे शोधायला सुरुवात देखील केली…..

स्थळंची इतकी सोपी रचना , हव्या त्या गोष्टीत स्थळ टीमची डायरेक्ट कस्टमर पर्यंत मदत , यामुळे विलाससाहेब व सौ आता “स्थळलाच” प्राधान्य देतात …..

आता डोन्ट वरी !!

जरी तुम्हाला ऑनलाइन प्रोफाइल क्रिएट नाही करता आली , तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा …..

आमची टीम आमच्या यशस्वी आश्‍वासनांचा आधार आहे……

आमचे टीम हेल्प सेंटर अगदी तुमच्या सोबत…..

तुम्ही फक्त आम्हाला माहिती द्या, आम्ही प्रोफाईल पण क्रिएट करू आणि तुम्हाला योग्य त्या स्थळ शोधासाठी अचूक मार्गदर्शन देखील करू ……

तर मग वाट कशाची पाहताय ?….

आजच आम्हाला कॉन्टॅक्ट करा….

आम्ही नक्कीच देऊ तुम्हाला जोडीदार……..

अगदी तुमच्या मनातला..!!

SthalTales #Story4

आता मात्र हद्द झाली होती…….

अमोली तिच्या मैत्रिणीला परवाच्या प्रसंगाबद्दल सांगत होती “अगं , काका आणि काकूंनी त्यांच्या जवळच्या एका विवाह संस्थेत ऑफर होती म्हणून माझे नाव नोंदवले होते…….

अपेक्षेप्रमाणे काहीच दिवसात मला स्थळं यायला सुरुवात देखील झाली होती…….अशातच मला त्या विवाह संस्थेमार्फत प्रोफेशनने सीए असणाऱ्या क्षितिज ची अोळख झाली होती …….घरी त्याच्या बद्दल सर्व माहिती देऊन, आई-बाबांशी डिस्कशन करून त्यांच्या परवानगीने मी त्याच्याशी भेटायला गेले……

वागण्या-बोलण्यातून मला तो जरा विचित्रच जाणवत होता……तसाच काहीसा तो भेटायचा कार्यक्रम आटोपून मी लवकर घरी परतले……..न जाणे तो काहीतरी लपवतोय अस वाटत होत….घरी येऊन आई बाबांच्या कानावर ही गोष्ट घातल्यावर , ते म्हणाले “अगं तू नर्वस असशील म्हणून तुला असं वाटत असेल” त्याच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याच्याशी बोलायचं ठरवलं……

पुढच्या दिवशीच मी तसं त्याच्या ऑफिसच्या पत्त्यावर गेले असता कळालं की , तसं कोणतही ऑफिस तिथे नव्हतंच …!

ही गोष्ट मी काकांना सांगून विवाह संस्थेत सांगितली…..पोलिसांकडून कळालं किती ते एक फेक प्रोफाईल होतं…..डोक्याला हात लावत मी खालीच बसले…..!!!

पायाखालची जमीनच सरकली गं ?” ..

“आता कोणावर आणि कसा विश्वास ठेवू मी, माझ्या मनातला जोडीदार मला खरचं मिळेल का गं ?”आणि तिच्या या प्रसंगाबद्दल ऐकून घेऊन तिच्या मैत्रिणीला “स्थळ” “मॅट्रिमोनी” बद्दल आठवले….ती तिला फोन मध्ये काही तरी सर्च करत म्हणाली ” अमोली , अगं तु अशी नाराज होऊ नकोस…अगं मागेच माझ्या मावस भावाला “स्थळ” “मॅट्रिमोनीमुळेच” मनातली जोडीदार मिळाली…..

# “स्थळ” “मॅट्रीमोनी” प्रत्येक स्थळाची माहितीही त्यांच्या सहा सूत्री संकल्पनेच्या आधारावरच करतात…

# खात्रीपूर्वक स्थळ शोधण्यात मदत करतात……

# तेही अगदी घरबसल्या…

अमोलीने त्या संध्याकाळी “स्थळ” “मॅट्रिमोनी” वर हवी ती माहिती फिल अप करून तिचे प्रोफाईल क्रिएट केले…..

स्थळ” “मॅट्रिमोनी” मुळे पुढच्या काही दिवसातच तिची ओळख अभिमन्यू सोबत झाली प्रोफेशन ने एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर असणारा अभिमन्यू मनाने खूप शांत व रिस्पेक्ट फुल होता…….त्याच्या आवडी-निवडी व त्याचे शिक्षण पाहून अमोलीला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटला होता…….त्याच्या बाबांना कॉन्टॅक्ट करून तिच्या बाबांनी तर तिची भेटायची इच्छा दर्शवली देखील…..येत्या रविवारी सुट्टीच्या दिवशी ते दोघं भेटले….पहिल्याच भेटीत त्याची ती आदराने दिलेली वागणूक , आनंदी व मनमिळावू स्वभाव पाहून ती जणू मनातच नाचत होती अभिमन्यूला देखील तिचा बोलका व कॉन्फिडन्ट स्वभाव भावला जणू हीच ती बेटरहाफ जिच्यासाठी मी थांबलो होतो असं जाणवलं….

इकडे दोघांच्याही घरी त्यांचा होकार ऐकून घरचे आता जल्लोषात लग्नाच्या तयारीला लागले…….

पुन्हा एकदा स्थळ मॅट्रिमोनी मुळेमनातले जोडीदार मिळाले…. ट्रस्टवर्थिनेसमुळे स्थळ मॅट्रिमोनीच्या परिवारात आता अमोली व अभिमन्यू हे जोडीदार देखील सहभागी झाले होते …..

पुन्हा एकदा स्थळ मॅट्रिमोनी ने सिद्ध करून दाखवले कि स्थळ मॅट्रिमोनी म्हणजे शोध जोडीदाराचा ,अगदी आपल्या मनातला..!!!

Download Sthal Marathi Matrimony App Now

Download the app and create your profile for FREE.
Find your compatible life partner with Sthal Marathi Matrimony

Sthal Matrimony Mobile App

Need help with registration?

+91 89569 90775