शशांक कॅनडाहुन भारतात आला तो फक्त लग्नासाठी मुली पाहायलाच. उच्चशिक्षित शशांक आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. फार्मसी इंडस्ट्रीत डॉक्टरेट करून कॅनडाच्या एका अतिशय नामांकित कंपनीत वरच्या हुद्यावर कार्यरत. नुकतंच एकोणतीस ओलांडून तिशीत प्रवेश. पूर्ण शिक्षण नाशिक मध्ये झालेले. आई विदुला नाशिक च्या कॉन्व्हेंट शाळेत शिक्षिका तर वडील श्रीकांत सरकारी कार्यालयात उच्चपदस्थ स्थानावर. त्यांचा नाशिकला स्वतःचा बंगला तर पुण्यातही 3Bhk चा टुमदार फ्लॅट. एकंदर कुटुंबाची आर्थिक बाजू अतिशय भक्कम.
श्रीकांत आणि विदुला यांनी ठरवलेच होते शशांकचे लग्न येत्या सहा महिन्यात पार पाडून मुलाच्या जबाबदारीतून मोकळे व्हायचे. लग्न होऊन वर वधू कॅनडा ला जातील. उच्चशिक्षित कुटूंब असल्याने मुलगी शोधायला काहीच अडचण येणार नाही असा विचार. नातेवाईक तर म्हणाले शशांक नुसता उभा राहूदे मुलींची कशी लाईन लागते की नाही बघाच.
उत्साहात स्थळं पाहायला सुरुवात केली. पण एका आठवड्यातच अडचण जाणवू लागली. मुलींच्या पालकांना एकतर कॅनडात मुलीने राहू नये अशी अपेक्षा होती तर काहींना शशांकचे शिक्षण,कंपनी याविषयी शंका. कारण इंजिनीरिंग केलेले IT त काम करणारे मुलगे सर्वमान्य असतात.
या कारणामुळे शशांक ची अपेक्षा होती की मुलीच्या आणि माझ्या अपेक्षा जुळाव्यात तसेच पालकांनाही एकमेकांच्या अपेक्षा आधीच कळाल्या तर एकमेकांना भेटणे सोपे होईल. तसेच मुलगी नाशिक मध्ये असेल तर उत्तमच. शशांक ने ही अडचण त्याचा मित्र अजिंक्यला सांगितली. अजिंक्य ने लगेच स्थळ मॅट्रिमोनी विषयी सांगितले. या संकेतस्थळावर शशांकने आपली सगळी माहिती रजिस्टर केली व फोटोही अपलोड केला. मुलीकडून काय अपेक्षा हे ही सविस्तर लिहिले. आणि एका आठवड्यातच सायली चे स्थळ आले. नाशिक मध्येच शिक्षण झालेले. दोघांचे प्रोफाइल ही जुळले. फोटोत शशांकला सायली आवडलीच होती. विदुला ने फोनवर सगळी चौकशी केली तर सायली लग्नानंतर कॅनडा त सेटल व्हायला तयार होती तसेच तिने इंजिननेरिंग केल्याने तिला कॅनडात नोकरीच्या अनेक संधीही होत्या. सायली नेही शशांकला भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे कळवले. नाशिकमध्येच असल्याने दोघेही दुसऱ्याच दिवशी भेटले. सायलीचा भाऊ फार्मा इंडस्ट्रीतच असल्याने शशांकच्या कामाविषयी कोणालाच कसलेच प्रश्न नव्हते. शशांक आणि सायली पहिल्या भेटीतच दोघांचेही विचार व अपेक्षा जुळल्या.
एका महिन्यात त्यांचे लग्नही झाले. आता दोघे कॅनडात सुखाने संसार करत आहेत. त्यांचे प्रोफाइल जुळवण्यात स्थळमॅट्रिमोनिची खूप मोलाची मदत झाली. देश असो वा विदेश स्थळ मॅट्रिमोनि मुळे कुठूनही योग्य स्थळांची माहिती मिळते. व तेही अगदी घरबसल्या…नक्की एकदा भेट द्या.