आम्ही_लग्नाळू

मामे भावाच्या लग्नात डीजे वर गाण लागलं , ” आम्ही लग्नाळू ” . सगळेच या गाण्यावर नृत्य करत होते पण राहुल मात्र कोपऱ्यात उभ राहून गंमत बघत होता. रेड्याला मिळतात म्हशी बी लई अन् गाईला मिळतात वळू …. या वाक्यावर त्याच्या मनात लग्नाविषयीच्या विचारांनी गर्दी केली.

गेले दोन वर्ष तोही कांद्यापोह्यांच्या कार्यक्रमाला जात होता. पण एकही मुलगी त्याला बायको म्हणून मनात भरली नाही. काही मुली आवडल्या तेव्हा त्यांच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा जुळत नव्हत्या. तो या सगळ्यामुळे वैतागला होता.

समाज कितीही बदलला तरी ‘ लग्न ‘ या विधीला आजही महत्त्व दिलं जातं. अनेक सिनेमामधे त्यांचे सुंदर दर्शन घडते. लहानपणापासून आपण आपल्या अवतीभोवती काय बघतो यापेक्षा सिनेमामधे लग्ना विषयी जो डोलारा उभा केला जातो त्याचीच आपल्या मनाला भुरळ पडते. आपण आपल्या लग्नाविषयी अनेक अशा अपेक्षा बाळगतो ज्यांची प्रत्यक्ष आयुष्यात फारशी गरज नसते. आयुष्य सुखी समाधानी व्हावे अशी अपेक्षा असेल तर लग्नातील दिखाव्यापेक्षा जोडीदार समजुतदार मिळायला हवा. पण घडते सगळे उलटेच. केवळ यंदा कर्तव्य आहे म्हणून मागचा पुढचा कोणताही विचार न करता अनेक स्थळे सुचवली जातात .

एकदा भेटून , चार प्रश्न विचारून नक्की स्वभाव कळतं नाही. फक्त अंदाज बांधता येतो. बांधलेल्या अंदाजावर पुढचे सगळे आयुष्य काढायचे म्हणजे महा कठीण काम. त्या परिस्थितीत आपल्यालाच नेमक कळत नसतं की आपल्या अपेक्षा नक्की काय आहेत . आपण फक्त आपल्या मनाच्या आवाजावर अवलंबून असतो . अनेकदा अपेक्षा जुळल्या तरी काही कारणाने गोष्टी पुढे जात नाही. या सगळ्याचा मनावर ताण येतो . त्यातून अपेक्षांमधे अनेक बदल आपण करत जातो तरी परिस्थिती तीच राहते.

रेड्याला कोणतीही म्हैस चालेल पण आपलं तस नाही . पूर्ण आयुष्य जिच्या संगतीने घालवायचे आहे तिलाही आपण पसंत पडायला हवं . तेव्हाच तर आयुष्याची आनंदी सुरवात करता येईल. गाण्यात म्हणायला काय जात कोणाचं प्रत्यक्षात केवळ लग्न करायचं आहे म्हणून कोणत्याही मुलीशी लग्न करायला आपल्याला अजिबात जमणार नाही .

त्याचे विचार सुरूच होते. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला . त्याची विचारशृंखला भंगली. त्याने मागे वळून पाहिले तर त्याचाच मामा त्याच्याशी बोलायला आलेला.

मामाने त्याला चिडवायचे म्हणून म्हंटले , ” नाचून घे रे मस्त …. एकदा का लग्न झालं की बायकोला विचारल्याशिवाय काही करता येणार नाही “. तो चटकन् बोलून गेला ,’ नंतर नाचता येईल की नाही माहीत नाही . सध्या जोडीदार मनासारखी मिळत नाही त्याच काय ?’

मामा लगेच म्हणाले,” अरे ‘स्थळ ला एकदा नक्की भेट दे . आम्हाला मिळाली तशी तुलाही तुझ्या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळतील. तुझ्या पंसतीचे अनेक पर्याय मिळतील . निवडलेला पर्याय काही कारणाने चुकीचा वाटला तरी *स्थळ* तुझ्या निर्णयाचा आदरच करते . तुझ्यावर कोणतीही सक्ती न करता इतर पर्याय सुचविले जातात . तेव्हा सगळ्या चींता सोडून दे आणि डीजेचा आनंद घे “.

मामाचे म्हणणे राहुललाही पटले . निवांत वेळ मिळताक्षणी सगळ्यात आधी ‘ स्थळ ला भेट देण्याचं त्यांनी मनोमन पक्क ठरवलं. ” आवाज वाढव डिजे तुला आईची शपथ आहे ” या गाण्यावर त्यानेही मग बेफिकर होवून ताल धरला.

Spread the love