पसंती तुमची … आनंद आमचा.

प्रेम विवाह असतो तेव्हा आधी … मन जुळतात … प्रेम होते …. नंतर लग्न हा एक सोपस्कार राहतो . परंतु वडीलधाऱ्यांच्या संमतीने केलेल्या विवाहात आधी ‘ लग्न सोहळा’ पार पाडतो . नंतर सतत सानिध्यात आल्याने एकमेकांचे गुण अवगुण

समजून घेत , वेळ प्रसंगी समजूत काढत …. संसार सुरू होतो . हळूहळू प्रेम फुलू लागते तसा संसार बहरू लागतो . सुखी संसारासाठी एकमेकांच्या प्रेमात असणं पुरेस नसतं. गरज असते ती एकमेकांना समजून घेण्याची . आयुष्याचा जोडीदार निवडतांना आवडीनिवडी जुळतात का? हे बघतांना …. खरं तर एकसारखे स्वभाव असण्यापेक्षा … एकमेकांना सामावून घेणारा स्वभाव असणे अत्यंत गरजेचे आहे. दोघंही रागीट असतील तर एकाने रागवल्यावर दुसऱ्याने समजूत काढण्याची मजा हरवून जाईल. दोघांनाही खर्च करण्यात आनंद येत असेल तर सुरक्षित भविष्याची तरतूद कोण करेल??

दोघंही मनाने हळवी असून चालत नाही कारण जेव्हा कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल तेव्हा एकाने दुसऱ्याला सावरायला हवं . आपण आपल्या आजूबाजूला अनेक उदाहरणं बघतो की दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकत्र येऊन खूप सुखाचा संसार करतात. ” Opposite attracts” या उक्तीला सार्थ असंच त्यांचं वागणं असतं.

तेव्हा एकमेकांचे स्वभाव जाणून घेवून …. आपल्याला योग्य अशा साथीदाराची निवड करण्यास ‘ स्थळ ‘ तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध करून देते . तुमची निवड …. योग्य की अयोग्य हे पडताळून पाहण्याचे स्वातंत्र्य देते . तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा आदर करते ….. कारण …. “लग्न हा व्यवहार नसून नवीन जीवनाचा प्रारंभ आहे” असे ‘स्थळ ‘ मानते. तुम्हाला तुमचे निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देत केवळ योग्य निर्णयापर्यंत पोहचण्यासाठी मदत करणारे एक उत्तम साधन म्हणून ” स्थळ ” काम करते.

तेव्हा वेळ घालवू नका …. निश्चिंत मनाने स्थळला एकदा भेट द्या

Spread the love