SthalTales#Story9

“आई वाढ लवकर…मॅच आहे आज माझी…”

बॅडमिंटन हातात घेत राधिका आईला सांगत होती.

“काय होणार या मुलीचं.. शिक्षण झालं तरी या बॅडमिंटन च्या मागे लागलीये, आज ही मॅच उद्या ती मॅच…लग्नानंतर कोण ऐकून घेईल हिचं सगळं?”

“मिळेल मिळेल…तिच्या बरोबरीचा जोडीदार नक्की मिळेल..”

“आभाळातून येणार आहे की देव दक्षिणेत टाकणार आहे??”

या सगळ्या गडबडीत राधिका नाष्टा करत कधी निघून गेली कळलंही नाही.

राधिका, नेशनल लेव्हल बॅडमिंटनपटू. ऑलिम्पिक चं स्वप्न पाहणारी महत्वाकांक्षी मुलगी.

शिक्षण पूर्ण झालं पण बॅडमिंटन च्या एकेक मॅचेस चालू असायच्या, ती जिंकायची कुठलीही संधी सोडत नसे.

मानव, एक क्रिकेटपटू… त्याचंही राधिका सारखंच.. दोघांचेही वय लक्षात घेता घरच्यांना लग्नाची काळजी वाटत होती.

राधिका ला स्थळं आली होती, पण “मुलीला स्वयंपाक येतो का, लग्नानंतर घर संभाळावं लागेल, बाकीचं काही करता येणार नाही..” अश्या अपेक्षा ऐकूनच तिने नकार कळवलेला.

तिकडे मानव पूर्ण वेळ क्रिकेट मध्ये घालवत होता, स्थिर अशी नोकरी नव्हती पण घरचा बिझनेस असल्याने त्याची फारशी गरज नव्हती. मानव अत्यंत मेहनती, प्रामाणिक आणि उत्कृष्ट खेळाडू होता.

पण नोकरी नसताना केवळ क्रिकेट खेळतो म्हणून कोणीही मुलगी द्यायला तयार नव्हतं.

दोघांच्या पालकांना ‘स्थळ मॅट्रिमोनि‘ बद्दल माहिती कळाली तसं दोन्ही कुटुंबांनी रजिस्ट्रेशन केलं.

असंच एकदा राधिका च्या वडिलांना मानव ची प्रोफाइल सापडली, आणि आनंदाने ते उड्या मारू लागले…

“काय हो काय झालं?”

“राधिका साठी उत्तम स्थळ मिळालं..”

“कुठे?”

“स्थळ..”

“हो पण कुठे मिळालं स्थळ??”

“अगं स्थळ वर…”

“वेड लागलंय तुम्हाला..”

स्थळ मॅट्रिमोनि नावाची वेबसाईट असते…तिथे…जाऊदे ना…इकडे ये हे बघ…मानव पुरोहित… क्रिकेटपटू… अपेक्षा… खेळाडू वृत्तीला समजून घेणारी, माझ्या क्रिकेट च्या प्रवासात सहकार्य करणारी, कौटुंबिक गोष्टीत अडकून न राहता मोठे स्वप्न पाहणारी महत्वाकांक्षी मुलगी..मुलगी स्वतः खेळाडू असल्यास उत्तम….”

“हे तर आपल्या राधिकेचंच वर्णन आहे की…”

राधिका मागून गपचूप ऐकत होती,

“काय नाव सांगितलं? मानव पुरोहित…fb वर शोधू याला…कसा आहे काय माहित…आई शप्पथ… हा मानव? कसला दिसतोय…आणि ट्रॅक सूट मध्ये, मैदानात…माझीच कॉपी आहे हा…”

बाहेरून आई वडील येतात..

“हे बघ…आम्ही काय सांगतो ते नीट एक..आता तुझं लग्नाचं वय झालंय, उशीर झाला तर जगाच्या प्रवाहात…”

“मला मानव पसंत आहे…”

आई वडील एकमेकाकडे पाहतात, राधिका आयुष्यात पहिल्यांदा लाजून निघून जाते…आणि आई वडील मोठ्या आनंदाने पुढची बोली करायला तयारीला लागतात.

दोघेही एकमेकाना भेटतात, पसंत पडतात…लग्न होतं.. एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा जोडीदार मिळाल्याने दृष्ट लागावी असा दोघांचा सुखी संसार होतो…

Spread the love