Published Oct 29, 2021 by Sthal
SthalTales#Story15
“अरे असं लोकांच्या लग्नात किती दिवस नाचणार आहेस? स्वतःच्या लग्नाचं बघ की जरा…”
सर्वेशला त्याचा मित्र म्हणाला आणि ते ऐकून सर्वेश फक्त हसला. त्याला आता या वाक्यांची सवय झाली होती. सर्वेश म्हणजे एक साधा सरळ मुलगा. इतरांप्रमाणे लग्न करावं आणि सुखाने संसार करावा अशी त्याचीही माफक अपेक्षा होती परंतु बऱ्याच प्रयत्नानंतर सुद्धा त्याचं लग्न जुळत नव्हतं. साहजिक आहे, आजकालच्या काळात लहानश्या गावात राहणाऱ्या आणि शेतीवाडी बघणाऱ्या सरळ स्वभावाच्या मुलाला कोण मुलगी देणार?
सर्वेशचे आईवडील गावातील अतिशय सज्जन जोडपे म्हणून ओळखले जात असे. त्यांनी आपल्या मुलासाठी अनेक मध्यस्थांतर्फे मुलगी बघण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येकवेळी त्यांना अपयशच आले. मुलींना मोठ्या कंपनीत अधिकारी असणारा किंवा सरकारी नौकरी असणारा, शहरात राहणारा नवरा असावा अशी अपेक्षा असायची आणि सर्वेश त्यांच्या अपेक्षेमध्ये बसत नसे.
एके दिवशी सर्वेशचा बालमित्र संजय त्याच्या घरी आला. संजय आयटी कंपनीत जॉबला होता. नुकतेच त्याचेही लग्न ठरले होते आणि लग्नाची पत्रिका देण्यासाठीच तो आला होता. पत्रिका स्वीकारताना सर्वेशच्या चेहऱ्यावरची निराशा संजय पासून लपली नाही. शेवटी त्याने विचारलेच,
“काय झालं मित्रा? एवढा निराश का दिसतो आहेस?”
“आता तुझ्यापासून काय लपवणार संजय? तू बघतोच आहेस माझ्या लग्नासाठी किती प्रयत्न सुरू आहेत पण कुठे जुळतच नाही.”
संजय म्हणाला, “अरे पण तू स्थळ मॅट्रिमोनीवर प्रयत्न केलास का? माझंही लग्न त्याच साईटवरून जुळलं आहे”
“हे स्थळ काय आहे?”
मग संजयने सर्वेशचा मोबाईल घेतला आणि त्याला स्थळ मॅट्रिमोनीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून दिले. त्याची प्रोफाइल त्यावर बनवली आणि ऍप कसे वापरायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले.आतापर्यंत एवढे प्रयत्न केलेच आहेत तर हा पण प्रयत्न करून बघू असे सर्वेशच्या मनात आले.
नीता एक अतिशय हुशार मुलगी. नीता शहरात राहत असली तरी तिला शेतीवाडीचे आकर्षण होते. ऍग्रीकल्चर विषयामध्ये डिग्री मिळवली असल्याने शेतात नवनवीन प्रयोग करण्यास ती इच्छुक होती. तिला जोडीदार हा शेती करणाराच हवा होता कारण तिच्या वडिलांकडे शेती नव्हती. नीताच्या वडिलांना नीताच्या लग्नाची नेहमी काळजी वाटत असे. तिला अनुरूप शेतकरी जोडीदार मिळेल का आणि मिळाला तर तो कसा असेल याचाच ते नेहमी विचार करत असत. त्यांनी नीताचे स्थळ मॅट्रीमोनीवर प्रोफाइल बनवून ठेवले होतेच. एके दिवशी सहज स्थळची साईट उघडून पाहिले असता त्यांना सर्वेशचे प्रोफाइल दिसले. सर्वेश हा नीताला अनुरूप जोडीदार ठरू शकतो हे त्यांच्या अनुभवी नजरेस चटकन लक्षात आले आणि त्यांनी आनंदित होऊन नीताला सर्वेशचे प्रोफाइल दाखवले.
देखणा, रांगडा सर्वेश बघताक्षणीच नीताला आवडला आणि तिने तिच्या वडिलांना पुढील बोलणी करण्यासाठी होकार दिला. मग स्थळ मॅट्रीमोनीच्या माध्यमातून रीतसर सर्वेशला संपर्क केला गेला. त्याला तर विश्वासच बसेना! ऍप डाउनलोड करून अवघे दोनच दिवस झाले असताना मुलीचे वडील स्वतः संपर्क करत आहेत ही बातमी त्याने त्याच्या आईवडिलांना सांगितली. मग नीता तिच्या पालकांसह सर्वेशच्या गावी त्याला भेटण्यास आली. अर्थातच, तिच्या ज्या अपेक्षा होत्या त्या सर्व अपेक्षा सर्वेश पूर्ण करत होता.
यथावकाश दोघांचे लग्न झाले आणि नीता व सर्वेश सुखी संसाराला लागले. नीताच्या शिक्षणाला आणि नवनवीन प्रयोग करण्याच्या स्वभावाला सर्वेशच्या कष्टाळू स्वभावाची जोड लाभली. आज ते दोघे प्रगतिशील शेतकरी जोडपे म्हणून सगळीकडे ओळखले जातात. पण त्यांची ओळख करून देणाऱ्या स्थळ मॅट्रीमोनीला मात्र ते विसरले नाहीत. प्रत्येक लग्नाळू तरुण तरुणीला ते स्थळचे ऍप डाउनलोड करून त्यावर प्रोफाइल बनवण्याचा सल्ला देतात आणि स्वतःचे उदाहरण देऊन आवर्जून सांगतात…
“अपेक्षा कश्याही असो, अनुरूप जोडीदार भेटतात फक्त आणि फक्त स्थळ मॅट्रीमोनीवरच!”