SthalTales#Story8

आज सविता काकूंची भिशी . त्यांनी जय्यद तयारी केली. प्रत्येकीची आवड लक्षात घेवून सगळा मेनू तयार केला. त्यांच्या आनंदाचे आणखी एक कारण होते , त्यांची मुलगी श्रेया हिचे लग्न ठरले होते. त्यांना ही आनंदाची बातमी आपल्या सगळ्या मैत्रिणीं देण्याची घाई झाली होती. सगळ्या तयारी सोबतच त्या होणाऱ्या जावयाचा फोटो सुंदर फ्रेममधे लावायला विसरल्या नव्हत्या. त्या फ्रेम वरून हात फिरवतांना त्यांच्या डोळ्यासमोरून झरकन दोन वर्षापूर्वीचे दिवस जात होते.

दोन वर्षां पूर्वी श्रेयाला छान पगाराची नोकरी मिळाली आणि तिच्यासाठी स्थळं सांगून यायला लागली. घरात एकच गडबड गोंधळ सुरू झाला. जावई कसा असावा याबद्दल आपली काही स्वप्न होती. जीवनाचा जोडीदार निवडताना श्रेयाच्या काही अपेक्षा होत्या. जिजाजी कसे असावे याबद्दल छोट्या श्रुतीचीही काही मतं होती.

येणारी अनेक मुलं तर आपल्यालाच भावी जावई म्हणून पटली नव्हती तर काही मुलं श्रेयाला तिच्यासाठी योग्य वाटली नाही. सगळ्यांच एकमत झालं त्या मुलांचे स्वभाव , आवडी निवडी , अपेक्षा यापैकी काहीच श्रेयाशी जुळत नव्हतं. नातेवाईकांच्या ” लग्ना नंतर होत सगळं नीट ” या वाक्यावर विश्वास ठेवून लग्न करून देण्याची आपली मुळीच तयारी नव्हती. लग्नानंतर या भिन्न आवडी निवडीमुळे दोघांचे वाद झाले तर? ….. या विचारानेच आपली रात्रीची झोप उडाली होती. जितकं टेन्शन आपल्याला त्यापेक्षा जास्त काळजीत श्रेया होती. लग्नाचं वय झालेलं, लग्न करायची अधीरता तर मनात होती पण लग्नानंतर अचानक बदलणारं आयुष्य याबद्दल इतरांचे विचार ऐकुन ती जास्त चिंतेत पडली होती. अनोळखी मुलाशी असं एकदाच भेटून, बोलून आयुष्यभराचा निर्णय घेणं तिला खूप जड जात होतं.

‘कांदे पोहे ‘ कार्यक्रमावर तर तिचा विश्वासचं नव्हता. ‘थोड्या वेळासाठी तर कोणीही चांगलच वागणार’ असं तिचं मत होतं. मुलाचा खरा स्वभाव कळल्याशिवाय लग्नाचं धाडस करण्याची तीची तयारी नव्हती. ‘लग्नासाठी नुसता मुलगा चांगला असून चालणार नाही तर त्याच्या घरचे वातावरण, लोकही जुळवून घेणारी असायला हवी’ असे आपले विचार होते. या सगळ्यात योग्य मुलगा शोधणे एक अवघड काम होवून बसले होते. भिशीतल्या रमा ताईंनी ‘ स्थळ ‘ बद्दल सांगितलं नसतं तर हा शोध कधी पूर्णही झाला नसता. त्यांच्यामुळे आपण ‘ स्थळ‘ वर श्रेयाची नाव नोंदणी केली. तिच्यासाठी योग्य अशी अनेक स्थळं सुचवल्या गेली . सुचवलेल्या स्थळांबद्दल सगळी माहिती दिल्या गेली. श्रेया आणि आपल्याला योग्य वाटलेल्या स्थळाशी भेटून , बोलून मिळालेल्या माहितीची खात्री करून घेता आली . एक मुलगा पसंतही पडला होता. सगळी बोलणी झाली होती पण ऐनवेळी श्रेयाला काही गोष्टींबद्दल खात्री वाटेना तेव्हा तिने नकार दिला . तिने दिलेला नकारही ‘ स्थळ‘ ने सकारात्मकतेने घेतला . इतर योग्य स्थळं सुचवली. तिची खात्री पटल्याशिवाय कसलीही घाई केली नाही की आपल्यावर कोणतीही सक्ती केली नाही. ‘ स्थळ ‘ स्वतः “लग्न म्हणजे आयुष्यातला खूप महत्त्वाचा निर्णय आहे. तेव्हा जोडीदार निवडतांना कसलीही तडजोड नको” या मताचे आहे .

या सगळ्यांचा परिणाम म्हणून समीर सारखा गुणी मुलगा आपल्याला जावई म्हणून मिळाला. त्याच्या घरचे वातावरण , लोकही अगदी आपल्यासारखी आहेत . श्रेयाला लग्नानंतर त्या घरात रुळायला मदतच होईल . असे विचार सुरू असतांनाच दारावरची बेल वाजली. दरवाजा उघडला तर भिशीच्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या. सगळ्यांच हसून स्वागत केलं. गप्पा गोष्टी रंगल्या . खाणं पिणं सुरू असतांनाच टेबलवर ठेवलेला समीरचा फोटो बघून मैत्रिणी म्हणाल्याच, ” भावी जावई का ? “

सविताने ही मग समीरचं तोंड भरुन कौतुक केलं. लग्न ठरल्याचे पेढे दिले. तेवढ्यात श्रेयाला घरापर्यंत पोहचवायला आलेला समीरही सगळ्यांना भेटला. त्याच्याशी भेटून बोलून सगळ्या मैत्रिणींचीही खात्री पटली की रमाने सुचवल्या ‘ स्थळ ‘ ने खरंच श्रेयासाठी योग्य मुलगा जोडीदार म्हणून मिळवून दिला आहे.

पुढच्या भिशीमधे लग्नासाठी रुखवत काय काय करायचा ? हे ठरवायचं कबुल करून सगळ्यांनी हसून निरोप घेतला.तुम्हालाही चांगला जावई किंवा सून मिळवायची असेल. आपल्या पाल्यासाठी योग्य जोडीदार हवा असेल तर एकदा ‘ स्थळ ‘ ला नक्की भेट द्या.

Spread the love