Published Jul 09, 2021 by Sthal
SthalTales #Story6
नेहाच्या सगळ्या मैत्रिणींचे लग्न झाले. संसार सुरू झाले तरी तिच्या लग्नाचा योग जुळून येत नव्हता. अनेक नातेवाईकांनी लग्न लवकर जुळत नाही म्हणून वाट्टेल तशी स्थळ सुचवली. “योग्य नसलेल्या मुलाशी लग्न करून आयुष्य वाया घालवण्यापेक्षा मी लग्नच करणार नाही” असं तिन बजावून सांगितले तरी ” तडजोड करावीच लागते ” अशी प्रतिक्रिया देवून स्थळ सुचवणे सुरूच होते.
प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने लग्नाचा योग पुढे ढकलला जात होता. नेहा रोज रोजच्या चर्चेला कंटाळून गेली होती. घरच्यांनी तर ,” तुला एखादा मुलगा पसंत असेल तर तस सांग आपण त्याचा ही विचार करू ” असं सांगून टाकलं. इतकी वर्षे फक्त उत्तम शिक्षण घेण्यावर भर दिला . चांगली नोकरी मिळाली तेव्हा त्यात पुढे जाण्यासाठी कामात स्वतःला बुडवून घेतल. आता असं अचानक आपल्याला कोणता मुलगा पसंत आहे म्हणून कसं सांगायचं ? तिला तर लग्न हा विषयच नकोसा झाला.
लग्नाबद्दल तिची काही स्वप्न होती. जोडीदाराबद्दल तिच्या काही अपेक्षा होत्या. त्या सगळ्यांना विचारात न घेता केवळ लग्न करायचं आहे म्हणून करायचं हे तिला मान्य नव्हतं. आयुष्यातला इतका महत्त्वाचा निर्णय केवळ लोकांच्या आग्रहाला बळी पडून घेण्यात तिला अजिबात रस नव्हता.
येणाऱ्या स्थळांमध्ये काहींना तिचे शिक्षण जास्त वाटायचे , काहींना तिची नोकरी नको असे , काहींना तिच्या उंचीचा त्रास , काहींना तिच्या रंगाचा , काहींना सगळं योग्य वाटलं तरी तिने घर उत्तम सांभाळून नोकरी करावी आणि पगार मात्र घरच्यांच्या स्वाधिन करावा अशा अवास्तव अपेक्षा. अनेकांनी तिला होकार दिला होता ते केवळ तिचा गलेलठ्ठ पगार बघूनच. या सगळ्यात तिला काय हवंय, तिच्या अपेक्षा काय याचा कोणीच विचार करत नव्हतं आणि नेमकी तिला हेच खटकत होतं. अनेकदा नात्यातली स्थळ असल्याने तिने नकार दिल्यावर दुखवलेल्यांनी तिचीच बदनामी केली. या सगळ्यांचा परिणाम म्हणून तिने लग्न या विषयावर बोलणेच बंद केले.
ऑफिस मधे सहकारी असलेल्या पूजा या मैत्रिणीचे लग्न ठरले. तिने साखरपुड्याचे आमंत्रण देत लाडू दिले तेव्हा सगळ्यांनी नेहालाही ती कधी लाडू देणार आहे असे चिडवले. तेव्हा तिने ते हसण्यावर नेल पण नंतर तिची चिडचिड झाली. तिची चिडचिड बघून पूजाने तिला तिच्या चिडण्याचे कारण विचारले.’ मुलगा मनासारखं मिळेपर्यंत थांबण्याची माझी तयारी आहे पण सतत लोक जेव्हा लग्न , त्यात कराव्या लागणाऱ्या तडजोडीबद्दल बोलतात, लग्न झालं की होत सगळं नीट असा खोटा दिलासा देतात , येईल त्या स्थळाला होकार देण्यासाठी आग्रह धरतात तेव्हा चिडचिड होते ” असं नेहानेही मोकळेपणाने सांगितलं . तेव्हा पूजा पट्कन बोलून गेली ,” बस एवढंच ना , तुला हवा तसा मुलगा मिळण्यासाठी ” स्थळ ” नक्कीच मदत करेल. इथे तुझी आवड आणि अपेक्षा बघून तुला अनेक पर्याय सुचवले जातात. त्यातील तुला जो पर्याय योग्य वाटेल त्याबाबतीत तुला हवी असलेली सगळी माहिती दिली जाते . खात्री पटेपर्यंत तूला विचार करायला वेळ दिला जातो. निर्णय घेण्यासाठी कोणतीही घाई केली जात नाही. यानंतरही काही कारणाने तुला नकार द्यायचा असेल तर त्यावरही कसलीच हरकत घेतली जाणार नाही. उलट तुझ्या मतांचा पूर्ण आदर करून इतर पर्याय सुचवले जातात. तेव्हा तू एकदा ‘ स्थळ‘ ला नक्की भेट दे. तुझी समस्या नक्की दूर होईल.”
नेहाने तरी शंका घेतलीच,” स्थळ बद्दल तुला एवढी माहिती कशी मिळाली ” त्यावर पूजाने तिला डोळा मारून सांगितलं ,” मला राहुल या ‘ स्थळ ‘ मुळेच तर मिळाला आहे “.
राहुल पूजासाठी सर्व प्रकारे योग्य मुलगा होता . नेहा अनेकदा त्याला भेटली होती . पूजाने आज सांगितलं म्हणून कळलं नाहीतर तर ती त्या दोघांचे लव्ह मॅरेज आहे असंच समजत होती.
त्या दोघांकडे बघून तिला ‘ स्थळ‘ बद्दल खात्री पटली. तिनेही तातडीनं ‘ स्थळ’ वर तिची नाव नोंदणी केली. ‘निवड तुमची विश्वासार्हता आमची ‘ ही टॅग लाईन वाचल्यावर तर ती अगदी निश्चिंत झाली.
नेहासारखे तुम्हालाही निश्चिंत व्हायचे असेल तर ‘ स्थळ‘ ला एकदा भेट द्याच . कारण पर्याय जरी आमचे तरी पसंती तुमचीच….