SthalTales #Story2

ऑफिस मध्ये श्वेता ने राजीनामा दिला आणि पाटील काकांच्या मनात धस्स झालं. पाटील काकांना ती आपल्या मुली प्रमाणे होती. तिची हुशारी, तिचं वाकचातुर्य, तिचा धाडसी स्वभाव या सर्वांचाच काकांना मोठं कौतुक वाटायचं. कारण त्यांची मुलगी अर्पिता अगदी तशीच होती.

काकांना मोठं आश्चर्य वाटलं, कंपनीत इतकी छान प्रगती होत असताना हिने का राजीनामा द्यावा?

त्यांनी न राहवून तिला विचारलं,

“बाळ, अगं तू नोकरी का सोडतेयस? सगळं इतकं छान आहे तरी…”

“काका, माझ्या बहिणीचं लग्न झालं, ती खूप खुश आहे संसारात, त्यांचाच घरच्यांनी माझ्यासाठी एक स्थळ आणलं, खूप श्रीमंत आहेत ते. माझ्या आई वडिलांना अगदी आकाश ठेंगणे झाले, पण त्यांची अट आहे की मी नोकरी करायची नाही”

“अगं जर मुलीला स्वातंत्र्य नाही तर ती श्रीमंती काय उपयोगाची?”

“काका पटतंय मलाही, पण बहिणीचा सुखी संसार पाहून माझाही तसाच व्हावा अशी आई वडिलांची ईच्छा आहे, सध्या तरी मी नोकरी सोडतेय, आई वडिलांना समजवायचा प्रयत्न करीन मी तरीही..”

काका विचारात पडले, श्वेता च्या आई वडीलांसारखं आपल्याकडूनही वागलं गेलं तर? आपणही लोभापायी मुलीच्या स्वातंत्र्यावर गदा आणली तर?

गेले 24 वर्षांचा काळ काकांच्या डोळ्यासमोरून गेला. किती लाडाकोडात वाढवलं अर्पिताला, ती सर्वगुणसंपन्न व्हावी म्हणून गाण्याचा क्लास, चित्रकलेचा क्लास, स्विमिंग, कराटे सगळं सगळं शिकवलं. तिला खूप शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. आज ती स्वाभिमानाने जगत आहे. पण लग्नानंतर? तिच्यावर बंधनं आली तर? इतक्या मेहनतीने घडवलेल्या आपल्या मुलीला पिंजऱ्यात अडकवलं गेलं तर? एखाद्या जखमी गरुडासारखी तिची अवस्था होईल. कारण झेप घेणं हे तिच्या रक्तात आहे आणि तिचे पंखच छाटले गेले तर ती तग धरू शकेल? असंख्य विचारांनी काकांच्या मनात काहूर माजलं.

एकदा असंच एक स्थळ चालून आलं. अर्पिता ला त्या मुलाचं नाव सांगितलं तर तिने फेसबुक वर त्याला पाहिलं. कानावर आलेलं की मुलगा खूप संस्कारी आहे. अर्पिता ने फेसबुक वर त्याचे दारूच्या बाटल्यां सोबतचे फोटो दाखवले. पाटील काका म्हणाले,

“काय कमाल आहे, लोकं एखाद्याचं वर्णन अव्वाच्या सवा सांगतात त्याची चौकशी न करता. पण तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं त्यामुळे त्याची ओळख पटली, असंच लग्नाच्या बाबतीत झालं तर? म्हणजे एखाद्या व्यकीची नीट आणि खरी माहिती दिसली तर?”

काकांनी इंटरनेट वर शोध सुरू केला. त्यातच त्यांना स्थळ मॅट्रिमोनी ची माहिती मिळाली. अर्पिता ला विश्वासात घेऊन त्यावर रजिस्ट्रेशन केलं. आणि शोध सुरू झाला तो योग्य जोडीदाराचा.

अशातच त्यांना सुशील ची प्रोफाइल सापडली. त्याचा अपेक्षा त्यांनी वाचल्या, त्यात होतं की

“कर्तृत्ववान, हुशार आणि स्वतंत्र विचारांची मुलगी हवी”

काकांना खूप आनंद झाला. अर्पिता ला असाच जोडीदार हवा जो तिच्या शिक्षणाचा आणि हुषारीचा आदर करेल. आणि सुशील त्यांना तसाच दिसला.

त्यांनी त्याच्याशी संपर्क केला, त्याच्याशी बोलणंही झालं. नावाप्रमाणेच तो सुशील होता. सुशीलला अर्पिताचा नम्रपणा खूप भावला. आणि शेवटी भेटण्याचे निश्चित झाले.स्थळ मॅट्रिमोनी ने सर्व काळजी घेऊन आणि सर्व पडताळणी करून त्या दोघांना एकत्र आणले. अर्पिता केव्हा त्याला भेटून घरी येते असं काकांना झालं.

तिकडे सुशील आणि अर्पिता, एकमेकांना पाहून लाजले. हळूहळू बोलायला सुरुवात केली.

“तुमच्या काय अपेक्षा आहेत माझ्याकडून??” सुशील म्हणाला..

“जास्त काही नाही, पण मला स्वातंत्र्य हवं.. विचारांचं, नोकरी करण्याचं आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं..”

“माफ करा पण मी ते देऊ शकत नाही” सुशील म्हणाला.

अर्पिता च्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला…ती त्याच्याकडे पाहतच राहिली…तो पुढे म्हणाला…

“माणूस जन्मतःच स्वातंत्र्य सोबत घेऊन येतो, ते मी तुम्हाला किंवा तुम्ही मला देण्याची गोष्ट नाही. मी तुम्हाला स्वातंत्र्य देणं म्हणजे माझ्याकडे मालकी हक्काची भावना आलीच ना? मी दिलं म्हणून मी मोठा झालो आणि तुम्ही घेतलं म्हणून तुम्ही लाचार झालात. तुम्ही स्वतंत्र आहात. आणि मला तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारू नका, पण आयुष्यात स्वातंत्र्य कुणाकडेही मागू नका. मनमुरादपणे जीवनाचा आनंद घ्या, स्वातंत्र्य हा माणसाचा मूलभूत हक्क आहे. आपल्या स्वातंत्र्याची सूत्र दुसऱ्याचा हातात देऊ नका”

अर्पिता भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिली.

“आता तुमच्या शिवाय मी कुणालाही स्वीकारू शकत नाही”

दोघांचाही होकार झाला.

घरी पाटील काका डोळ्यात प्राण आणून अर्पिता ची वाट पाहत होते, तिच्या डोळ्यातलं पाणी अजूनही थांबत नव्हतं.

ती आली आणि काकांनी तिच्या डोळ्यात पाणी पाहिलं. काका बैचेन झाले.

“काय झालं पोरी?”

अर्पिता ने त्यांच्यात झालेलं सगळं बोलणं ऐकवलं.

काकांना भरून आलं. केव्हा एकदा सुशील ला भेटतो आणि त्याची गळाभेट घेतो असं त्यांना झालं.

स्थळ मॅट्रिमोनी चे त्यांनी मनापासून आभार मानले.

जोरदार लग्न पार पडलं. लग्नात सजावट पासून सर्व गोष्टीत अर्पिता ची मतं घेण्यात आली होती, सुशील च्या आई वडिलांनाही हुशार सून मिळाल्याचा खूप आनंद झालेला.

काका सुट्ट्या संपवून ऑफिस ला परतले, तिथे श्वेता ला परत आलेलं पाहून काका खुश झाले.

“काका, माझ्या आई वडिलांनी त्या मुलाला नकार कळवला, योग्य मुलगा मिळे पर्यन्त आता ते लग्नाच्या मागे लागणार नाहीयेत..”

काकांनी तिला तडक स्थळ मॅट्रिमोनी वर रजिस्ट्रेशन करायला सांगितलं आणि अर्पिता ची कहानीही ऐकवली.

आता श्वेता तिच्या योग्य जोडीदाराच्या शोधात आहे. तुम्हीही बघताय सुशील सारखा जोडीदार आपल्या बहिणीसाठी किंवा आप्तेष्टांसाठी?? लगेच रजिस्ट्रेशन करा स्थळ मॅट्रिमोनी वर.

Spread the love