SthalTales#Story13

सावळ्या दिप्तीचे लग्न किशोर सारख्या रुबाबदार मुलाशी झाले तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.

तिच्या काही मैत्रिणींना तिचा हेवा ही वाटला.

दिप्तीला आणि तिच्या आई वडिलांना लोकांनी कायम तिच्या रंगावरून ऐकवलं. दिप्तीचं लग्नाचं वय झालं तसे तर सगळेच वाटेल ते सल्ले देवू लागले. मुलगी सावळी म्हणजे एक तर कोणताच मुलगा पसंत करणार नाही. कोणी पसंत केलंच तर त्याला नाही म्हणण्याचा दिप्तीला अधिकार नाही.

दिप्तीच्या घरातलं वातावरण अगदीच तंग झालं. आपल्या मुलीलाही तिचा जोडीदार निवडण्याचा अधिकार मिळायला हवा या विचाराने आईवडील दोघेही अस्वस्थ झाले. लहानपणापासून त्यांनी समाजाने कितीही सांगितलं तरी तिच्या रंगला महत्त्व दिले नव्हते. तिला योग्य शिक्षण मिळावे , ती स्वतःच्या पायावर उभी राहावी यासाठीच प्रयत्न केले. दिप्तीही बुध्दीने तल्लख होती. सगळ्या कामात उत्तम गती होती. उच्च शिक्षण चांगल्या गुणांनी तर पूर्ण केलच पण चांगल्या पगाराची नोकरीही मिळवली.

ती स्वभावानेही अगदी मनमिळावू होती. केवळ रंगाने तिच्यावर अन्याय व्हावा हे तिच्या वडिलांना मान्य नव्हते . इतरांच्या सल्यांना दुर्लक्षित करून त्यांनी ‘ स्थळ ‘ चे अँप डाऊनलोड केले. त्यावर दिप्तीची सगळी माहिती दिली.

दिप्तीच्या माहितीला साजेशी अनेक उत्तम स्थळ ‘ स्थळ ‘ अँप कडून सुचवली जावू लागली. हे अँप तुम्ही अमुक एक स्थळच निवडावे अशी सक्ती तुमच्यावर करत नाही. सुचवलेल्या स्थळांना नाही म्हणण्याच स्वातंत्र्य तर तुम्हाला देतेच पण तुम्हाला पसंत पडेपर्यंत इतर अनेक योग्य स्थळांचे पर्याय उपलब्ध करून देते. यातच त्यांना किशोरचे स्थळ सुचवल्या गेले होते. किशोरला दिप्ती पसंत होती. त्याने तिच्या रंगापेक्षा तिच्या अंगी असलेल्या गुणांना महत्त्व दिले होते. किशोरला भेटल्यावर दिप्तीलाही जाणवू लागले होते की तो तिच्या मतांचा आदर करतो. तिने तिच्या कार्यक्षेत्रात प्रगती करावी म्हणून प्रेरणा देतो. एवढंच नाही तर त्याच्या घरच्यांनाही दिप्तीबद्दल , तिच्या कामाबद्दल कौतुक होत.

दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय पक्का केला तेव्हा दोन्ही कुटुंब आनंदून गेली. लग्न धुमधडाक्यात पार पडले.

अरेंज मॅरेज सारख्या पारंपारिक पद्धतीतले काही अनावश्यक ठोबळ नियम मोडत दोघांनी आपल्या पसंतीचा जोडीदार निवडला होता तो केवळ ‘ स्थळ ‘ अॅपमुळेच.

प्रत्येकाला आपल्यासाठी योग्य असलेल्या जोडीदाराची निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे . तुम्हालाही योग्य जोडीदार निवडायचा असेल तर आजच स्थळ अँप डाऊनलोड करा आणि चिंता मुक्त व्हा….. कारण

” स्थळची फक्त मध्यस्ती करते….. पसंती अखेर तुमचीच असते.”

Spread the love