SthalTales#Story12

सावंत वहिनी जिना चढत असताना पायरीवर बसलेल्या बायकांची कुजबूज त्यांच्या कानावर पडली.

“यांच्या सईचं कुठे बाहेर आहे वाटतं ?”

“मग तिनं सरळ सांगावं नं आईला?”

“वय होत आलं नं सईचं.”

“मुलींची लग्न कशी वेळच्यावेळी व्हायला हवीत.”

“आमच्या क्षमाचं नाही का बावीसाव्या वर्षी लग्न केलं आम्ही.

एका वर्षात गोरागोमटा नातूपण मिळाला.”

“खरंच गं बाई भाग्याची तू.”

सावंत वहिनींना फार वाईट वाटलं. त्या कधी असं मागून कुणाविषयी बोलत नसत. आणि या शेजारणी ज्यांना त्या गावी गेल्या की आठवणीने काजूआंब्याची भेट आणून द्यायच्या ,कधी छान मालवणी रेसिपी बनवली तर शेजारपाळं द्यायच्या त्याच आज त्यांच्या सईबद्दल कुजबुजत असलेलं पाहून त्यांना फारच दु:ख झालं.

घरी येऊन थोडा वेळ सोफ्यावर लवंडल्या तोच त्यांना अंधारल्यासारखं झालं तसं त्यांनी फेमिली डॉक्टरांना फोन लावला. डॉक्टर त्यांचे पेशंट संपवून थोड्या वेळात आले. त्यांनी सावंत वहिनींच बीपी चेक केलं. बीपी फारच वाढलं होतं. डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या व म्हणाले नुसत्या गोळ्या घेऊन उपयोग नाही. तुम्ही कसलातरी मानसिक ताण घेतलाय तो कमी झाला पाहिजे.

सावंत वहिनी म्हणाल्या,”काय सांगू डॉक्टर, सईचं लग्नच कुठे जमत नाहीए. त्यामुळे मला खूप टेंशन आलंय. एकतर ती काळसावळी त्यामुळे कोणाच्या पसंतीस उतरत नाही. त्यात आजुबाजूचे तिचं बाहेर काहीतरी असेल म्हणून कुजबुजतात.”

डॉक्टर म्हणाले,”आजुबाजूच्यांच काय एवढं मनावर लावून घेता. चालायचच ते. जित्याची खोड..”

सईचं नाव आपण ‘स्थळ मेट्रीमोनी‘वर रजिस्टर करा.

तिचं वय,जन्मतारीख,शिक्षण,व्यवसाय ,अपेक्षा,रंग,उंची..

सगळं तिच्या प्रोफाईलमध्ये लिहा. ‘स्थळ मेट्रीमोनी’ आपल्या वेळेची काळजी घेते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हे संकेतस्थळ बनवलेलं आहे. माझ्या बऱ्याच मित्रांच्या मुलांची लग्न जमवण्यात स्थळ मेट्रीमोनी’चा मोलाचा वाटा आहे. आमच्या शुभदाचंही मी ‘स्थळ मेट्रीमोनी‘वर प्रोफाइल बनवायचं ठरवलंय.”

डॉक्टर निघून जाताच सावंतवहिनींनी सईला ‘स्थळ मैट्रोमोनी‘विषयी फोनवरून सांगितलं.

सईने स्थळ मेट्रीमोनीच्या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन केलं व प्रोफाईलमध्ये तिची माहिती लिहिली. लग्नानंतरही नोकरी करणार असल्याचं स्पष्ट नमूद केलं.

या संकेतस्थळावर शोध घेत असताना तिच्या मनाजोगता जोडीदार ‘प्रविण’ तिला दिसला. दिसताक्षणी मनात भरावा असा. त्याच्या रंगाविषयी काही अपेक्षा नव्हत्या. ‘बाह्य रंगापेक्षा अंतरंगावर माझा जास्त विश्वास आहे’असं त्याने प्रोफाईलवर लिहिलं होतं. सईला प्रविणचं प्रोफाईल फार आवडलं. पुढे त्यांचं लग्न जुळवण्यात ‘स्थळ मेट्रीमोनी‘ने मोलाची मदत केली.

सावंत वहिनींनी त्यांच्या अजून दोन चार मैत्रिणींना स्थळ मेट्रीमोनी‘विषयी आवर्जून माहिती दिली.

Spread the love