SthalTales#Story11

सुरेश काकांना पीहू ही एकुलती एक कन्या. काकूंच्या माघारी त्यांनी पीहुला अतिशय लाडात वाढवले आहे. चांगल्या शिक्षणा सोबतच चांगले संस्कारही दिलेत. पीहूचं त्यांचं जग आहे. पीहूला नोकरी लागली तेव्हा काकांना खूप आनंद झाला पण त्याच बरोबर तिच्या लग्नाबद्दल काळजीही वाटू लागली. पीहूचं लग्नाचं वयही झालंच होतं. अनेक चांगली स्थळं ही सांगून येत होती पण पीहूला एकही स्थळ पसंत पडेना.

पीहूची अटच तशी होती. लग्नानंतर सासरच्या लोकांना आपलंसं करण्याची , त्यांची जबाबदारी घेण्याची पीहूची तयारी होती पण तिच्या जोडीदाराने ही तिच्या वडिलांचं करतांना मनापासून करावं एवढीच तिची अपेक्षा होती . त्याला कारणही तसंच होतं , गेली अनेक वर्षे काका फक्त पीहूसाठी झटत होते. लग्नानंतर ते एकाकी पडू नये म्हणून पीहूने तशी अट घातली होती.

काही मुलांना पीहूची अट मान्य असली तरी त्यांच्यां घरच्यांना पीहूची ही अट त्रासदायक वाटायची. अनेक स्थळ येवूनही पीहूचं लग्न काही ठरत नव्हतं. काकांनी तिला खूप समजावलं की ,” अशी अट घालू नकोस . माझं मी करायला समर्थ आहे “. पण पीहू ऐकायला तयार नव्हती .

काकांना दिवसेंदिवस पीहूच्या लग्नाची चिंता अधिकच सतावू लागली. ही चिंता आता त्यांच्या चेहऱ्यावरही दिसू लागली. आता तर पीहूची अट ऐकल्यामुळे तिच्यासाठी योग्य स्थळं सुद्धा येतं नव्हती.

एक दिवस काका सकाळी मॉर्निंग वॉकला म्हणून घराबाहेर पडले पण त्यांचं मन चालण्यात काही लागेना . त्यांनी बागेतल्या बाकावर बसून घेतलं. विचाराच्या तंद्रीत ते शून्यात नजर लावून बसले. त्यांचे मित्र त्यांना या अवस्थेत पाहून त्यांच्या जवळ येवून बसले. काकांच्या समस्येचं कारण जाणून घेतल्यावर त्यांच्या मित्रांपैकी एक असलेल्या सदा काकांनी लगेच स्वत:च्या मोठ्या भावाला फोन लावला आणि त्यांनी लग्न ठरवण्यासाठी जे अँप download केलं होतं त्याची सगळी माहिती घेतली.

ती माहिती घेतल्यावर सदा काकांचा चेहरा तर खुललाच सोबत आता आपला मित्र ही चिंता मुक्त होणार याची खात्री पटली. सहा महिन्यापूर्वीच त्यांच्या पुतणीच लग्न झालं होतं त्या लग्नाबद्दल , नवीन जावयाबद्दल, त्याच्या घरच्यांबद्दल सदा काका नेहमी भरभरून कौतुक करायचे.

त्यांच्या मोठ्या भावाला त्यांची मुलगी सायलीसाठी अगदी योग्य स्थळ मिळाले होते. पीहूलाही तिच्या योग्यतेचे स्थळं मिळावे अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती.

त्यामुळे आता सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सदा काकांनी भावासोबत झालेलं संभाषण सांगायला सुरुवात केली ,” दादाने सायलीचे लग्न ठरवतांना मदत करणारे ‘ स्थळ‘ चे नवीन अँप download केले होते. त्यावर सायलीची सगळी माहिती दिली . बस्…. मग काय तिच्या माहितीला जुळणाऱ्या अनेक योग्य मुलांची नावे ‘ स्थळ ‘ कडून सुचवली जावू लागली. आपण ‘ स्थळ ‘ ने सुचवलेल्या स्थळांना नकार दिला तरी ते इतर अनेक योग्य स्थळांचे पर्याय उपलब्ध करून देतात. स्थळ निवडतांना तुम्हाला हवा तितका वेळ तुम्ही घेवू शकता. तुमच्यावर कसलीही सक्ती केली जात नाही. कारण ” आपलं समाधान हिच त्यांच्या योग्यतेची पावती” ते मानतात.

सुचवलेल्या स्थळांमधून समीर यांचे स्थळ आमच्या घरात सगळ्यांनाच पसंत पडले . त्यांच्या घरच्यांनाही सायली फार आवडली . आज दोघंही आनंदाने संसार करत आहेत. अजून काय हवं?” इतर मित्रांना सदा काकांमुळे ‘ स्थळ ‘ बद्दल उपयुक्त माहिती मिळाली. त्यांचं बोलणं ऐकून सुरेश काकांनी तर लगेच ‘ स्थळ ‘ च अँप डाऊनलोड केले.

तुम्हालाही आपल्या पाल्याच्या लग्न संदर्भात चिंता सतावत असेल तर वाट कसली बघताय लगेच ‘ स्थळ ‘ चे अँप डाऊनलोड करा आणि तुमची सगळी चिंता ‘ स्थळ ‘ वर सोपवा. “आपलं समाधान हिच आमच्या योग्यतेची पावती”

Spread the love