Search

SthalTales#Story7


आज काव्या फारच आनंदात होती . प्री वेडिंग शूटसाठी अनिकेत तिला घ्यायला येणार होता. दोघांनी मिळून खूप छान थीम ठरवली होती. खरं तर प्री वेडिंग शूट तिचं स्वप्न होत पण अनिकेतच्या घरच्यांना आवडणार नाही असं वाटून ती गप्प होती. अनिकेतशी बोलता बोलता सहज हा विषय निघाला आणि अनिकेतनेच पुढाकार घेतला म्हणून हे शक्य झालं होत.

ठरल्या वेळी तो सर्व तयारीनिशी हजर झाला. दोघंही ठरलेल्या ठिकाणी पोहचली. फोटोग्राफर आधीच तिथे पोहचला होता. सकाळची वेळ , सगळीकडे हिरवळ , हवेतला गारवा , सोबतीला अनिकेत .... तिचं मन अगदी प्रसन्न झालं.

अनिकेतला फोटो काढण्यात अजिबात रस नाही हे त्याने तिला एकदा सांगितलं होतं तरी केवळ आपल्यासाठी तो पुढाकार घेऊन शूटसाठी तयार झाला याचं तिला नवल वाटलं होतं. शूट दरम्यानही तो सतत तिची काळजी घेत होता . खूप सुंदर फोटो काढले . सगळं आवरून ते परतीच्या तयारीत होते. अजून थोडा वेळ असच एकमेकांच्या सहवासात घालवता यावे म्हणून अनिकेतने तिला जवळच्याच ढाब्यावर जेवायला नेले . गाडीतून उतरल्यावर ढाब्याकडे जातांना अचानक काव्याचा पाय साडीत अडकला आणि तिचा तोल गेला . आपण खाली पडणार म्हणून तिने डोळे गच्च मिटून घेतले पण तेवढ्यात अनिकेतने तिला सावरले. आयुष्याच्या वाटेवरही अनिकेत असाच सावरून घेईल अशी तिला खात्रीच पटली. मनोमन तिने ' स्थळ' चे आभार मानले . झरझर वर्षा पूर्वीचा भूतकाळ तिच्या नजरेसमोरून गेला. काव्या दिसायला सावली तरी नाकी डोळी नीटस. पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं पण तिला पूर्ण वेळ नोकरी करण्यात रस नव्हता. लग्नानंतर नोकरी न करता घर सांभाळावं, साजवावं, आल्या गेल्यांचं आनंदाने करावं. नवऱ्याने काम करून थकून यावं आणि आपण नीटनेटक्या घरानिशी हसून त्याच स्वागत करावं. असं तिचं स्वप्नं होत. काम केलं तर तेही केवळ पैसा मिळावा म्हणून नाही तर आपला आत्मविश्वास टिकून रहावा म्हणून. घर सांभाळून करता येईल तेच करायचं. लग्नानंतर नोकरीच केली पाहिजे अशी सक्ती नसावी. अस तिचं मत होतं. खरं तर गृहकृतदक्ष बायको सगळ्यांनाच हवी असते पण ती नोकरीही करणारी असली तर उत्तम. अशीच सगळ्यांची अपेक्षा होती. त्यामुळे कोणतेही स्थळ तिला होकार देत नव्हते. आपल्या पागाराकडे पाहून लग्न करणारा मुलगा तीला नकोच होता. योग्य मुलगा मिळेपर्यंत थांबायचं तिने पक्क केलं होतं.

सहजच तिने ' स्थळ ' वरही नोंदणी केली होती. तिथेच अनिकेत बद्दल तिला माहिती मिळाली. प्रत्यक्ष भेटल्यावर अनिकेतचे आणि तिचे विचार जुळत होते याची खात्री पटली. बायकोने नोकरी केलीच पाहिजे अशी त्याची सक्ती नव्हती आणि नोकरी करायचीच असली तरी त्याला त्याची ना ही नव्हती . तिच्या निर्णयाचा आदर पूर्वक स्वीकार केला जावा असे त्याचे मत होते.

कार्यक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या निर्णयात तो तिच्या मताला महत्त्व देत होता . तिला तिचे मत मांडण्यासाठी प्रेरित करत होता . त्याच्या वागणुकीतून जाणवत होत की,' तो इतरांवर स्वतःची मतं लादत नाही उलट इतरांच्या मताचाही आदर करतो , काळजी घेतो , स्वतः च्या जबाबदाऱ्या टाळत नाही'. तिला जसा जोडीदार हवा अगदी तसाच अनिकेत होता आणि केवळ ' स्थळ ' मुळेच हे शक्य झालं होत.

असे विचार तिच्या मनात सुरू होते आणि तिने हळूच पर्स मधून खास अनिकेतसाठी स्वतः भरत काम केलेल्या सुंदर कोरीव ' A' अक्षराच्या रुमालांच सेट अनिकेतला भेट म्हणून दिला. त्या रुमालावरचे सुंदर भरतकाम आणि त्यासाठी घेतलेली मेहनत बघून त्याला काव्याच्या प्रेमाची जाणिव नव्याने झाली . तो आनंदाने हसला आणि तिला म्हणाला ,' तुझं हे असं प्रेम व्यक्त करणचं मला खूप आवडत. तुझी माझी भेट घडवून दिल्या बद्दल ' स्थळ ' चे मानू तेवढे आभार कमीच आहेत " . ती सुंदर लाजली कारण तिलाही त्याचं म्हणणं मनोमन पटलं होत.

6 views0 comments

Recent Posts

See All

Start your partner hunt with Sthal

Download the app to enjoy the best matchmaking experience

Download the app

play-store.c8539031.png

Copyright © 2020 InscoMont Services Pvt Ltd

Quick Contacts