Search

मध्यस्ती आमची .... पसंती तुमची


पूर्वी मुला मुलींच्या घरच्यांना सुयोग्य स्थळ सुचवण्याचे काम मध्यस्थ मंडळी करत. घरच्या लोकांचा एकमेकांशी परिचय झाल्यावरच पुढचे सगळे ठरवण्यात येई. सगळ्या गोष्टींची बारीक सारीक चौकशी केल्यावर जर स्थळ योग्य वाटले तरच बघण्याचा कार्यक्रम होई. घरच्यांच्या पसंती पुढे मुला मुलींच्या पसंतीला फारसे महत्त्व नसे. आजच्या काळात ' लग्न ' या संकल्पनेत अनेक बदल झाले आहेत. काळ बदलत गेला तसे मुला मुलींच्या पसंतीला प्राधान्य क्रमात पाहिले स्थान प्राप्त झाले आहे. परंतु तरुण पिढी लग्न , जोडीदाराचा निवड करतांना अनेकदा केवळ भावनिकतेच्या आधारावर निवड करतांना दिसते . सिनेमात दाखवले जाणारे प्रेम हेच खरे समजून ते जोडीदाराचा शोध घेतांना दिसतात. जोडीदार निवडताना तो योग्य आहे की नाही हे पडताळून पाहण्याऐवजी क्षणिक भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतांना दिसतात. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र वरवरच्या दिसण्याला न भुलता जोडीदाराची निवड करतांना त्याला त्याच्या गुणदोषांसहित स्वीकारणे म्हणजे खरे प्रेम होय. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते . तेव्हा एकमेकांचे स्वभाव एकमेकांना सामावून घेणारे असण्याची आवश्यकता असते. संसार हा जरी दोघांना करायचा असतो. दोघं विवाह बंधनात बांधले जाणार असतात तरी प्रत्यक्ष आयुष्यात दोन कुटुंबाचे ऋणानुबंध जोडले जातात . हे संबंध जेवढे चांगले तेवढा दोघांचा संसार फुलत जाणार असतो. तेव्हा आजही घरच्यांच्या पसंतीला ही प्राध्यान्य क्रमात स्थान देणे गरजेचे आहे. स्पर्धेचे युग , नोकरी , कुटुंब यांच्या जबाबदाऱ्यामुळे मुला मुलींच्या कुटुंबाचा समाजातील वावर मर्यादित झाला आहे . पूर्वी समाजातील काही व्यक्ती ' मध्यस्थ ' म्हणून जे काम करायचे ते आता धावपळीच्या युगात त्यांना करणे शक्य होत नाही. त्यामुळे योग्य स्थळाची माहिती मिळणे कठीण जाते. या सगळ्यांचा समतोल साधला जावा , तसेच मध्यस्थाची भूमिका आजही चोख पार पाडली जावी यासाठी ' स्थळ ' कार्यरत आहे. 'स्थळ ' मुळेच तुम्हाला योग्य स्थळाची माहिती मिळते , तेही घर बसल्या बसल्या. ' स्थळ ' दोन सुयोग्य स्थळांचा एकमेकांशी परिचय करून देत पुढचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना देते. तुम्हाला खात्री पटल्या शिवाय कोणताही निर्णय घेण्याची सक्ती केली जात नाही. तुमचा जो काही निर्णय असेल त्याचा आदर केला जातो . तुमचे समाधान होईपर्यंत तुमच्या पसंतीचा अभ्यास करून इतर अनेक पर्याय उपलब्ध करून दिले जातात. तेव्हा चिंता सोडा . ' स्थळ ' ला एकदा भेट नक्की द्या.

7 views0 comments

Recent Posts

See All

Start your partner hunt with Sthal

Download the app to enjoy the best matchmaking experience

Download the app

play-store.c8539031.png

Copyright © 2020 InscoMont Services Pvt Ltd

Quick Contacts