SthalTales#Story10

दर रविवारी, सुट्टीच्या दिवशी कांदेपोह्यांचा कार्यक्रम. चापुनचोपून साडी नेसणं,मेकअप करुन बसणं,..मग पाहुण्यांची एंट्री आईवडलांचं त्यांच्यापुढे अजिजी करणं. जसं काय ती एखादी विकायची वस्तू आहे असं तिच्या गुणांच वरपक्षापुढे जरा फुगीरच कौतुक करणं..थोड्याच अवधीत मुलीने चहाचा,कांदेपोह्यांचा ट्रे घेऊन जाणं..

परत मातोश्रींच ,’आमच्या रियाने केलेत हो पोहे. सगळा स्वैंपाक अगदी निगुतीने करते. तिच्या हातच्या  पोळ्या अगदी तलम रेशमी. मसालेभात,बासुंदी,.सगळा चारी ठाव स्वैंपाक येतो हो आमच्या रियाला. शिवाय विणकाम,भरतकाम सगळं शिकलेय हो आमची रिया.”हे सगळे डायलॉग रियाचे पाठ झालेले होते. त्यात तिची जरा जास्तीची स्तुती तिची मातोश्री करत असे.

रिया नमस्कार करुन तिथेच खाली मुंडी घालून बसत असे. मग वरपक्ष तिचा इंटरव्यू घेत असे.मुली नाव काय तुझं? शिक्षण काय तुझं? स्वैंपाक करता येतो का? गाणं गाता येत का? नोकरी कुठे करतेस? लग्नानंतर करणार का नोकरी? नोकरी परमनंट आहे का?किती पगार आहे?

अजून वाढणार का?वास्तविक पहाता ह्यातल्या जवळजवळ साऱ्याच प्रश्नांची उत्तरं वरपक्षाला संबंधित गुरुजींनी आधीच दिलेली असतात तरी आपलं उगा रियाच्या डोसक्याचं दही.

यावरच थांबत नाहीत. दोघांना बाजुबाजूला उभं करुन उंची मोजणं..अरे काय हे शट् यार. आणि इतकं सगळं करुन वधुवर दोघांचीही पसंती झाली तरी एखादी विघ्नसंतोषी काकू, काका काहीबाही सांगून कार्यात विघ्न आणतात. तसं केलं की त्यांना कोण आनंद मिळतो.बघा हं तशी रिया दिसायला बरी आहे पण..पण अहो पण काय सांगा नं? इति वराची आई. अहो कसं सांगू तुम्हांला. कित्ती मित्र आहेत तिचे! रात्री किती उशिरा घरी येते! नुसता लाडोबा आहे. कसली शिस्त म्हणून नाही मुलीला. भांडते कसली!

असं का.बरं झालं.देवासारख्या भेटलात हो.आजच नकार कळवते. इति वराची आई.संबंधित काकूंच्या मुखावर मोहीम फत्ते झाल्याचं समाधान.रियाचे वडील मि.परांजपे पोरीच्या लग्नाच्या काळजीत.काय परांजपे कसली एवढी काळजी?अहो काय सांगू ,आमच्या रियाचं लग्न ठरता ठरता मोडतं.कोणतरी विघ्न आणतंय हो.अहो सोप्पं आहे.आमच्या दिव्याचं जमवलं आम्ही स्थळ मेट्रीमोनी साईटवरुन. तिथे सगळी माहिती फीड करा. आम्हांला अगदी अनुरुप जावई मिळाला.

परांजपे,तुम्हांलाही नक्कीच मिळेल हो.परांजपे स्थळ मेट्रीमोनी साईटवर रजिस्ट्रेशन करतात.इकडे मानवला रोज उठून मुली बघायला जायचा कंटाळा असतो.मुळात असं मुलींना प्रदर्शनात ठेवलेल्या वस्तूंसारखं पहायला जाणं त्याला मान्यच नसतं.तोही स्थळ मेट्रीमोनीवर आईवडलांना सांगून रजिस्ट्रेशन करतो.थोड्याच अवधीत परांजपेंना मानवची प्रोफाइल सापडते. रियाची व त्याची ट्रेकींगची आवड अगदी मेच होते.शिवाय रंग,उंची,शिक्षण,नोकरी,गोत्र..सगळं रियाला अनुरुप. परांजप्यांना मानव जावई म्हणून भावतो.परांजपे,रियाला माहिती शेअर करतात. प्रथमच विदाऊट कांदेपोहे आणि स्वतः च्या प्रदर्शनाशिवाय रियाला हवा तसा जोडीदार रियाला मिळतो.पहाताक्षणी तिला तो आवडतोही.रिया तिच्या वडलांना थँक्यू बाबा म्हणते.इकडे मानवलाही रियाची ट्रेकींगची आवड,तिचा एकूणच रांगडेपणा खूप भावतो.स्थळ मेट्रीमोनी साईटमुळे दोन मनं जुळू लागतात. रियाचं व मानवचं लवकरच शुभमंगल होतं व त्यांचा संसार सुखाचा होतो.

Spread the love