SthalTales #Story1

“झालं तुझ्या मनासारखं? आता पश्चाताप करून काय उपयोग आहे आई?” सोनल आपल्या आईला चिडून म्हणते.

“सोनल अगं त्याचाबद्दल मी खूप चांगलं ऐकलं होतं म्हणून तुझ्या चुलत बहिणीसाठी स्थळ सूचवलेलं मी. मला काय माहीत की तो मुलगा असा निघेल.”

“हेच तर चुकतं ना आई आपलं, केवळ याच्या त्याच्या बोलण्यावरून आणि ऐकिवात असलेल्या माहितीवरून आपण एखाद्या बद्दल प्रतिमा उभी करतो, पण आज जमाना असा आहे ना की कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही, त्या मुलाचं नुसतं आधार कार्ड जरी मागितलं असतं ना आई तर आपल्याला त्याचं खरं नाव तरी कळलं असतं, तरी बरं वेळीच त्या मुलाबद्दल माहिती कळली आणि फसवणूक टाळली आपली”

सुमन ने तिच्या पुतणीसाठी एका नातेवाईकाच्या सांगण्या नुसार स्थळ आणलं होतं, पण तो मुलगा परदेशात आहे असं खोटं सांगून फसवायला निघालेला.

सुमन ला आता टेन्शन आलं, तिच्या पुतणी सोबत झालं ते सोनल सोबत नको व्हायला.

सोनल एक स्मार्ट आणि हुशार मुलगी, कुणाच्याही बंधनात अडकून राहायला तिला आवडत नसे. आई वडिलांनाही तिला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते आणि म्हणूनच तिने मोठ्या धैर्याने स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केलेली. आता सोनल चं लग्नाचं वय झालेलं, पण तिला त्या पारंपरिक दाखवण्याच्या आणि चहापोहे कार्यक्रम चा भारी तिटकारा,

“मुलगी म्हणजे काही वस्तू आहे का दाखवायला? शोभेच्या वस्तू सारखं 4 लोकांसमोर जाऊन आपला दिखावा, तेही लाजत, मान खाली घालत.. I hate this kind of stereotypes” असं ती नेहमी म्हणायची.

“सोनल सगळं मान्य आहे, पण असा मुलगा कुठे शोधणार? तुझं आहे का कोणाशी बाहेर?”

“आई तुला चांगलं माहीत आहे, माझा सगळा वेळ अभ्यास आणि करियर मध्ये गेला, या सर्वांसाठी मला वेळच मिळाला नाही, मी अरेंज मॅरेज करणार”

इतक्यात सोनल ची मैत्रीण यामिनी घरी आली,

“अय्या सोनल, लग्न करतेस? कधी? कोण आहे मुलगा?”

“अगं माझे आई, अजून कशात काही नाही”

“यामिनी बाळ तूच आता सांग हिला, हिच्या पसंतीचा मुलगा आता कुठून शोधणार आम्ही? आणि आजकाल फसवणूक इतकी वाढलीये की कोण खरा कोण खोटा यातलं काहीच समजत नाही बघ”

“सोनल माझ्याकडे एक मस्त solution आहे, स्थळ मॅट्रिमोनी वर रजिस्ट्रेशन कर, तुला तूझ्या स्वप्नातला राजकुमार नाही मिळाला तर नाव बदलून टाक माझं”

“नको ग बाई, बेटा अगं ऑनलाइन तर जास्त फसवणूक होते”

“अहो काकू स्थळ मॅट्रिमोनी वाले मुलाचं आयडी कार्ड,त्याचा कंपनीची माहिती, त्याचे शासकीय कागदपत्र या सगळ्यांची पडताळणी केल्याशिवाय अश्या लोकांना साईट वर येऊच देत नाहीत”

“म्हणजे इतकी सुरक्षितता आहे? सोनल बाळ, लगेच कर ते”

“ठीक आहे आई, यामिनी म्हणते म्हणून ट्राय करायला काही हरकत नाही”

सोनल आपलं रजिस्ट्रेशन करते आणि आपली सर्व माहिती साईट वर टाकते.

तिकडे विनय त्याचा घरी पुन्हा चिडचिड करतो,

“आई वहिनी का ग बाहेर पडायला नाही म्हणतेय? इतकं शिक्षण केलंय तिने, इतकी हुशार आहे ती तरी चूल अन मूल यात अडकून पडतेय ती”

“बाळ अरे ज्याची त्याची आवड असते, आपण काही नाही म्हटलो का तिला”

“तुला सांगतो आई, मी अशी मुलगी पाहीन ना की जी स्वतंत्र विचारांची आणि चूल व मूल या चौकटीच्या बाहेर पडलेली असेल” विनय वैतागून बोलून जातो.

“अच्छा, म्हणजे तुला लग्न करायचंय तर” आई गालातल्या गालात हसून म्हणते.

विनय भानावर आला आणि आपण काय बोलून गेलो याचं त्यालाच हसू आलं. विनय ने सुद्धा नुकतंच स्थळ मॅट्रिमोनी वर रजिस्ट्रेशन केलं होतं.

सोनल साईट वर गेली असता तिला विनय च नाव recommendation मध्ये दिसलं, त्याला पाहता क्षणी तिला भास झाला की हाच तो ज्याला आपण शोधत होतो.

तिने त्याची प्रोफाइल पहिली, त्याची आवड निवड आणि छंद अगदी तिच्याशी मिळते जुळते होते. तिने त्याच्याशी बोलायला सुरुवात केली, बोलण्या नंतर सोनल ला लक्षात आलं की दोघेही चुकीच्या पारंपरिक रूढी आणि परंपरा यांच्या विरोधात होते आणि व्यक्तीस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.

विनय ला सोनल चा बिनधास्त आणि मोकळा स्वभाव फार आवडला, लग्नानंतर तिला फक्त घरात अडकून पडायचं नव्हतं हे तिने सांगितलं आणि तो आनंदाने उडयाच मारायला लागला, त्याला अशीच बायको हवी होती.

बस, हेच तर हवं होतं.

दोघांनाही आपल्या मनाजोगता जोडीदार मिळाला, आणि आपल्या उज्जल भविष्याची दोघांनीही मुहूर्तमेढ रोवली. आता सोनल च्या आईने स्थळ मॅट्रिमोनी साईट चा ऍड्रेस पाठ करून ठेवलाय आणि कुणीही स्थळ सुचवा म्हटलं की ती हा ऍड्रेस त्याला लिहून देते.