निर्णय कसा घेऊ

” खरंतर बाबा…हे लग्न ठरविण्यापुर्वी मला अनयाशी एकट्यात भेटायला आवडेल…तुम्ही विचार करत असाल की काय एकट्यात भेटायच आहे तर काही भविष्यातील आराखडे सोबतीने आखु शकतो हे ठरवायचे आहे…”असे म्हणुन अनिकेत वसंतरावांच्या कडे आशेने पाहिले.ते विचार करत असताना सुलभाताई चटकन म्हणाल्याच,” अनिकेत…असं काही आमच्या वेळेस नव्हतं तरीही चांगला सुरु आहे ना आमचा संसार?? तुम्हा आजकालच्या मुलांच हे नवीनच खुळ निघालयं…”

अनिकेत खरा विचारात पडला,”पिढी बदलली,अपेक्षा बदलल्यात,मुलींना समानतेचा दर्जा दिला जातोय आणि आपण अजुनही त्याच काळात जगणार का? कधी मला काही अपेक्षा नसतीलही पण तिच्या अपेक्षा मी पुर्ण करु शकलो नाही तर तिचा भ्रमनिरास नको व्हायला.दोघांनी एकमेकांच्या मताचा आदर केल्याशिवाय संसार आनंदी होत नाही,पण मग आईवडिलांना हे समजवायचं कसं?..”

आजकालच तसं हे अतिशय काँमन चित्र आहे.पिढी पिढीतले मतभेद ज्याला आपण जनरेशन गँप म्हणतो ते तसेच रहातात आणि मग बरेचदा घरातल्या मोठ्या माणसांची मनं जपण्यासाठी आयुष्याची गाठ इच्छेविरुध्द किंवा भावनिकतेने झुकुन बांधली जाते.पण मग अश्याप्रकारचे लग्न यशस्वी ठरतात का? लग्न हे दोन परिवारांच्यात होते म्हणले तर खोटे ठरणार नाही.त्यामुळे दोघांनीही घरच्यांना सोबत घेऊन निर्णय घेतला तर संसार आनंदी होतो.मोठ्यांची मनं सांभाळता आली व विश्वास कमानला की काही गोष्टींकडे दुर्लक्ष होते व काही गोष्टी ते आपल्यासाठी सोडतात.

अनिकेतने आईला विचारले,”तु खुप भारी होतीस म्हणुन तुला जमलं हा सगळं सांभाळण…मला अनयाला तुझे उदाहरण सांगुन विचारावे लागेल की जमेल का ग बाई तुला असं सहज शक्य…” अनिकेतचे ऐकुन सुलभाताई खुष झाल्या,”बघा बोलुन…पण संसार हा स्वत:चा स्वत:सारखाच करावा हा…त्याची गोडी जास्त असते…”असं म्हणत त्याला अनयाशी भेटायला परवानगी दिली. काही नाती ही कोणालाही न दुखवता जपली जाऊ शकतात,पण हवी असते ती मनापासुन नातं जपण्याची इच्छा व मनाचा मोठेपणा…दोन्हीही पिढींकडुन व दोन्ही पक्षाकडुन.

Spread the love

  • #bride
  • #KhattaMitta
  • #relationships
  • #wedding