लग्न नातेवाईक आणि स्थळ

नमस्कार!

आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न म्हणजे अतिशय जिव्ह्याळ्याचा विषय. लग्न म्हणजे दोन जिवांचं नाही, तर दोन कुटुंबाचं मिलन. आणि अशा या लग्नाच्या बेडीत दोन जीवांना बांधणारे, सर्वच अगदी उत्साही असतात. लग्नाचा विषय छेडण्यापासून, ते जुळवण्यापासून तर अगदी अक्षता टाकण्यापर्यंत. सर्व काही कसं, अगदी हौशीने. मुला-मुलींच्या आई बाबांपेक्षा अवचित उगवणाऱ्या नातेवाईकांचा यात सिंहाचा वाटा असतो. थोडंसं तऱ्हेवाईक वाटेल, पण खरंच आहे की! लग्न झालेल्यांना काही वेगळं विचारायला नको.

मुला-मुलींच्या संगोपणापसून, संस्कार लावणे, त्यांना शिकवणे, लहानाचं मोठं करणे आणि त्याने न सांगता त्याला हवं असलेलं सर्व काही पुरवणे, याचा विचार मुलाचे आई बाबा यांहून जास्त चांगला कोण करत असत. पण जेव्हा लग्न, या आयुष्यातील सो कॉल्ड सर्वात महत्वाचा विषय निघतो, तेव्हा अचानक तो जागतिक तापमान वाढीपेक्षा पेचाचा प्रश्न होऊन पडतो. आणि अर्थातच त्याचं निरसन करण्यासाठी न विचारता शेकडो हात सरसावतात. बहुतांशी वेळा, मुलाला किंवा मुलीला किती चांगला आणि अनुरूप जोडीदार मिळाला, यापेक्षा आपण किती उत्तम पद्धतीने संबंध जुळवून आणले, आणि कामगिरी बजावली, याचा टेंभा मिरवण्यासाठी रशाकशी सुरू होते.

बिचाऱ्या मुला-मुलींच्या आवडीचा, किंवा त्यांच्या आवडीबद्दल त्यांच्या पालकांचं मत कुणी समजूनच घेत नाही. स्थळ सुचवण्यात गैर नाही. जुळवून आणलेल्या लग्नात जितके नाती – गोती जास्त तितकी जास्त आणि मुख्याकरून खात्रीशीर स्थळं पाहण्यात येतात. पण आपण आणलेलं स्थळ किती उत्तम आहे आणि ते तू करावसंच यावरच जास्त भर असतो. आणि मग अनेक स्थळं पाहून आणि सततच्या नातेवाईकांच्या भरामुळे, बऱ्याच वेळी असं होत, की आपण होकार देऊनच टाकतो. जास्त काही विचार न करता. मुलं मुली आनंदी होतात, हौशी नातेवाईकांपासून त्यांचा माग सुटला म्हणून, आणि अर्थातच ‘ ते ‘ खूष होतात लग्न जुळवलं म्हणून. आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवून अगदी उत्साहात असते ही मंडळी. विशेष या गोष्टीचं वाटतं, लग्न जुळवताना जितक्या अनपेक्षितणे ही मंडळी समोर येते, तितक्याच वेगाने नंतर दिसेनाशी होते.

शेवटी परत तेच राहतात, मुलगा, मुलगी (अर्थात आता वर वधू) त्यांचे आई वडील!

देव करो, पद्धत कितीही पारंपरिक का असेना. वरील सहा माणसं शेवटपर्यंत आनंदी असायला हवेत. पण बहुतांशी चित्र वेगळंच असतं, सामाजिक दबाव किंवा पीर प्रेशर यामुळे नाहक अनेक जीव भरडले जातात, अगदी कायमचे! कुठेतरी हे थांबायला हवं.

मित्रांनो आणि पालकांनो! आपल्या या अनेक प्रश्नांची खात्रीशीर आणि तुम्हाला पूर्ण पटेपर्यंत प्रयत्न करण्यासाठी आम्ही आलो आहोत. आमची एकच गोष्ट विशेष आहे. आमच्याकडे कोणताही साचा नाही. प्रत्येक मुलगा आणि मुलगी हे वेगळे आहेत आणि अर्थात त्यांच्या पसंतीच्या संकल्पना. आणि प्रत्येकासाठी आम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. दुसरं विशेष म्हणजे खात्रीशीर माहिती. तुम्हाला दिलेली प्रत्येक माहिती आमच्या विविध पातळ्या ओलांडून आलेली असणार आहे. त्यामुळे त्याची पूर्ण जबाबदारी आमची! आणि हो, एक फार महत्त्वाचं राहिलंच, एखाद स्थळ आवडलं नाही असं तुम्ही सांगितलं, तरी ‘ स्थळ ‘ ला वाईट वाटणार नाही.

तर मग वाट असली पाहताय. आत्ताच नाव नोंदवा. निवड तुमची, विश्वासार्हता आमची.