google-play

8 Reasons why you should choose Sthal Matrimony among other Maratha Matrimony sites.

Once you become of so-called marriageable age, everyone especially your relatives start asking you about your marriage plans and preparations for the same. Dodging such questions on the way one fine day you end up searching for the best matrimony sites/services for your community.

But as there are multiple options available in the market, it becomes difficult to select the right fit for your requirement.

So if you are a Maratha girl/boy, looking for a compatible life partner from your community, willing to take help of matrimony site for finding your better half and confused between the available options, kindly check out Sthal Matrimony. Sthal Matrimony is one stop solution for all your matchmaking processes. Here are 8 reasons listed why you should go for Sthal Matrimony.

  1. Exclusive Maratha Matrimony Site: As Sthal focuses only on Maratha matchmaking for first marriages, your search for prospective alliance becomes more specific and easy.
  2. Verified Profiles: As 6 level profile verification is done with respect to the government ID, mobile, email, Facebook, LinkedIn and company website only genuine profiles are made available also we ensure 100% screening and verification of profiles on different parameters so you get only authentic profiles.
  3. Detailed Profiles: You can see the detailed profile of the prospect with respect to the 7 parameters which help you to understand the person better and have a suitable match.
  4. No Dating Site: Sthal is strictly not a dating site, as we make sure to keep only genuine proposals by their verification and also option to report a profile with non-serious intent is made available.
  5. Safety & Security: Your profile is safe as only registered and approved users can see your profile and photos and your contact details are shared only with verified profiles.
  6. Dedicated Support Teams: Sthal has dedicated support teams to handle customer problems and are available on call for assistance when required.
  7. Recommendation Engine: You get profile recommendations through Sthal’s analytics engine based on your expectations mentioned in the profile.
  8. Download Your Profile: You can create your detailed profile and download it in PDF format to share it further.

SthalTales#Story10

दर रविवारी, सुट्टीच्या दिवशी कांदेपोह्यांचा कार्यक्रम. चापुनचोपून साडी नेसणं,मेकअप करुन बसणं,..मग पाहुण्यांची एंट्री आईवडलांचं त्यांच्यापुढे अजिजी करणं. जसं काय ती एखादी विकायची वस्तू आहे असं तिच्या गुणांच वरपक्षापुढे जरा फुगीरच कौतुक करणं..थोड्याच अवधीत मुलीने चहाचा,कांदेपोह्यांचा ट्रे घेऊन जाणं..

परत मातोश्रींच ,’आमच्या रियाने केलेत हो पोहे. सगळा स्वैंपाक अगदी निगुतीने करते. तिच्या हातच्या  पोळ्या अगदी तलम रेशमी. मसालेभात,बासुंदी,.सगळा चारी ठाव स्वैंपाक येतो हो आमच्या रियाला. शिवाय विणकाम,भरतकाम सगळं शिकलेय हो आमची रिया.”हे सगळे डायलॉग रियाचे पाठ झालेले होते. त्यात तिची जरा जास्तीची स्तुती तिची मातोश्री करत असे.

रिया नमस्कार करुन तिथेच खाली मुंडी घालून बसत असे. मग वरपक्ष तिचा इंटरव्यू घेत असे.मुली नाव काय तुझं? शिक्षण काय तुझं? स्वैंपाक करता येतो का? गाणं गाता येत का? नोकरी कुठे करतेस? लग्नानंतर करणार का नोकरी? नोकरी परमनंट आहे का?किती पगार आहे?

अजून वाढणार का?वास्तविक पहाता ह्यातल्या जवळजवळ साऱ्याच प्रश्नांची उत्तरं वरपक्षाला संबंधित गुरुजींनी आधीच दिलेली असतात तरी आपलं उगा रियाच्या डोसक्याचं दही.

यावरच थांबत नाहीत. दोघांना बाजुबाजूला उभं करुन उंची मोजणं..अरे काय हे शट् यार. आणि इतकं सगळं करुन वधुवर दोघांचीही पसंती झाली तरी एखादी विघ्नसंतोषी काकू, काका काहीबाही सांगून कार्यात विघ्न आणतात. तसं केलं की त्यांना कोण आनंद मिळतो.बघा हं तशी रिया दिसायला बरी आहे पण..पण अहो पण काय सांगा नं? इति वराची आई. अहो कसं सांगू तुम्हांला. कित्ती मित्र आहेत तिचे! रात्री किती उशिरा घरी येते! नुसता लाडोबा आहे. कसली शिस्त म्हणून नाही मुलीला. भांडते कसली!

असं का.बरं झालं.देवासारख्या भेटलात हो.आजच नकार कळवते. इति वराची आई.संबंधित काकूंच्या मुखावर मोहीम फत्ते झाल्याचं समाधान.रियाचे वडील मि.परांजपे पोरीच्या लग्नाच्या काळजीत.काय परांजपे कसली एवढी काळजी?अहो काय सांगू ,आमच्या रियाचं लग्न ठरता ठरता मोडतं.कोणतरी विघ्न आणतंय हो.अहो सोप्पं आहे.आमच्या दिव्याचं जमवलं आम्ही स्थळ मेट्रीमोनी साईटवरुन. तिथे सगळी माहिती फीड करा. आम्हांला अगदी अनुरुप जावई मिळाला.

परांजपे,तुम्हांलाही नक्कीच मिळेल हो.परांजपे स्थळ मेट्रीमोनी साईटवर रजिस्ट्रेशन करतात.इकडे मानवला रोज उठून मुली बघायला जायचा कंटाळा असतो.मुळात असं मुलींना प्रदर्शनात ठेवलेल्या वस्तूंसारखं पहायला जाणं त्याला मान्यच नसतं.तोही स्थळ मेट्रीमोनीवर आईवडलांना सांगून रजिस्ट्रेशन करतो.थोड्याच अवधीत परांजपेंना मानवची प्रोफाइल सापडते. रियाची व त्याची ट्रेकींगची आवड अगदी मेच होते.शिवाय रंग,उंची,शिक्षण,नोकरी,गोत्र..सगळं रियाला अनुरुप. परांजप्यांना मानव जावई म्हणून भावतो.परांजपे,रियाला माहिती शेअर करतात. प्रथमच विदाऊट कांदेपोहे आणि स्वतः च्या प्रदर्शनाशिवाय रियाला हवा तसा जोडीदार रियाला मिळतो.पहाताक्षणी तिला तो आवडतोही.रिया तिच्या वडलांना थँक्यू बाबा म्हणते.इकडे मानवलाही रियाची ट्रेकींगची आवड,तिचा एकूणच रांगडेपणा खूप भावतो.स्थळ मेट्रीमोनी साईटमुळे दोन मनं जुळू लागतात. रियाचं व मानवचं लवकरच शुभमंगल होतं व त्यांचा संसार सुखाचा होतो.

SthalTales#Story9

“आई वाढ लवकर…मॅच आहे आज माझी…”

बॅडमिंटन हातात घेत राधिका आईला सांगत होती.

“काय होणार या मुलीचं.. शिक्षण झालं तरी या बॅडमिंटन च्या मागे लागलीये, आज ही मॅच उद्या ती मॅच…लग्नानंतर कोण ऐकून घेईल हिचं सगळं?”

“मिळेल मिळेल…तिच्या बरोबरीचा जोडीदार नक्की मिळेल..”

“आभाळातून येणार आहे की देव दक्षिणेत टाकणार आहे??”

या सगळ्या गडबडीत राधिका नाष्टा करत कधी निघून गेली कळलंही नाही.

राधिका, नेशनल लेव्हल बॅडमिंटनपटू. ऑलिम्पिक चं स्वप्न पाहणारी महत्वाकांक्षी मुलगी.

शिक्षण पूर्ण झालं पण बॅडमिंटन च्या एकेक मॅचेस चालू असायच्या, ती जिंकायची कुठलीही संधी सोडत नसे.

मानव, एक क्रिकेटपटू… त्याचंही राधिका सारखंच.. दोघांचेही वय लक्षात घेता घरच्यांना लग्नाची काळजी वाटत होती.

राधिका ला स्थळं आली होती, पण “मुलीला स्वयंपाक येतो का, लग्नानंतर घर संभाळावं लागेल, बाकीचं काही करता येणार नाही..” अश्या अपेक्षा ऐकूनच तिने नकार कळवलेला.

तिकडे मानव पूर्ण वेळ क्रिकेट मध्ये घालवत होता, स्थिर अशी नोकरी नव्हती पण घरचा बिझनेस असल्याने त्याची फारशी गरज नव्हती. मानव अत्यंत मेहनती, प्रामाणिक आणि उत्कृष्ट खेळाडू होता.

पण नोकरी नसताना केवळ क्रिकेट खेळतो म्हणून कोणीही मुलगी द्यायला तयार नव्हतं.

दोघांच्या पालकांना ‘स्थळ मॅट्रिमोनि‘ बद्दल माहिती कळाली तसं दोन्ही कुटुंबांनी रजिस्ट्रेशन केलं.

असंच एकदा राधिका च्या वडिलांना मानव ची प्रोफाइल सापडली, आणि आनंदाने ते उड्या मारू लागले…

“काय हो काय झालं?”

“राधिका साठी उत्तम स्थळ मिळालं..”

“कुठे?”

“स्थळ..”

“हो पण कुठे मिळालं स्थळ??”

“अगं स्थळ वर…”

“वेड लागलंय तुम्हाला..”

स्थळ मॅट्रिमोनि नावाची वेबसाईट असते…तिथे…जाऊदे ना…इकडे ये हे बघ…मानव पुरोहित… क्रिकेटपटू… अपेक्षा… खेळाडू वृत्तीला समजून घेणारी, माझ्या क्रिकेट च्या प्रवासात सहकार्य करणारी, कौटुंबिक गोष्टीत अडकून न राहता मोठे स्वप्न पाहणारी महत्वाकांक्षी मुलगी..मुलगी स्वतः खेळाडू असल्यास उत्तम….”

“हे तर आपल्या राधिकेचंच वर्णन आहे की…”

राधिका मागून गपचूप ऐकत होती,

“काय नाव सांगितलं? मानव पुरोहित…fb वर शोधू याला…कसा आहे काय माहित…आई शप्पथ… हा मानव? कसला दिसतोय…आणि ट्रॅक सूट मध्ये, मैदानात…माझीच कॉपी आहे हा…”

बाहेरून आई वडील येतात..

“हे बघ…आम्ही काय सांगतो ते नीट एक..आता तुझं लग्नाचं वय झालंय, उशीर झाला तर जगाच्या प्रवाहात…”

“मला मानव पसंत आहे…”

आई वडील एकमेकाकडे पाहतात, राधिका आयुष्यात पहिल्यांदा लाजून निघून जाते…आणि आई वडील मोठ्या आनंदाने पुढची बोली करायला तयारीला लागतात.

दोघेही एकमेकाना भेटतात, पसंत पडतात…लग्न होतं.. एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा जोडीदार मिळाल्याने दृष्ट लागावी असा दोघांचा सुखी संसार होतो…

SthalTales#Story8

आज सविता काकूंची भिशी . त्यांनी जय्यद तयारी केली. प्रत्येकीची आवड लक्षात घेवून सगळा मेनू तयार केला. त्यांच्या आनंदाचे आणखी एक कारण होते , त्यांची मुलगी श्रेया हिचे लग्न ठरले होते. त्यांना ही आनंदाची बातमी आपल्या सगळ्या मैत्रिणीं देण्याची घाई झाली होती. सगळ्या तयारी सोबतच त्या होणाऱ्या जावयाचा फोटो सुंदर फ्रेममधे लावायला विसरल्या नव्हत्या. त्या फ्रेम वरून हात फिरवतांना त्यांच्या डोळ्यासमोरून झरकन दोन वर्षापूर्वीचे दिवस जात होते.

दोन वर्षां पूर्वी श्रेयाला छान पगाराची नोकरी मिळाली आणि तिच्यासाठी स्थळं सांगून यायला लागली. घरात एकच गडबड गोंधळ सुरू झाला. जावई कसा असावा याबद्दल आपली काही स्वप्न होती. जीवनाचा जोडीदार निवडताना श्रेयाच्या काही अपेक्षा होत्या. जिजाजी कसे असावे याबद्दल छोट्या श्रुतीचीही काही मतं होती.

येणारी अनेक मुलं तर आपल्यालाच भावी जावई म्हणून पटली नव्हती तर काही मुलं श्रेयाला तिच्यासाठी योग्य वाटली नाही. सगळ्यांच एकमत झालं त्या मुलांचे स्वभाव , आवडी निवडी , अपेक्षा यापैकी काहीच श्रेयाशी जुळत नव्हतं. नातेवाईकांच्या ” लग्ना नंतर होत सगळं नीट ” या वाक्यावर विश्वास ठेवून लग्न करून देण्याची आपली मुळीच तयारी नव्हती. लग्नानंतर या भिन्न आवडी निवडीमुळे दोघांचे वाद झाले तर? ….. या विचारानेच आपली रात्रीची झोप उडाली होती. जितकं टेन्शन आपल्याला त्यापेक्षा जास्त काळजीत श्रेया होती. लग्नाचं वय झालेलं, लग्न करायची अधीरता तर मनात होती पण लग्नानंतर अचानक बदलणारं आयुष्य याबद्दल इतरांचे विचार ऐकुन ती जास्त चिंतेत पडली होती. अनोळखी मुलाशी असं एकदाच भेटून, बोलून आयुष्यभराचा निर्णय घेणं तिला खूप जड जात होतं.

‘कांदे पोहे ‘ कार्यक्रमावर तर तिचा विश्वासचं नव्हता. ‘थोड्या वेळासाठी तर कोणीही चांगलच वागणार’ असं तिचं मत होतं. मुलाचा खरा स्वभाव कळल्याशिवाय लग्नाचं धाडस करण्याची तीची तयारी नव्हती. ‘लग्नासाठी नुसता मुलगा चांगला असून चालणार नाही तर त्याच्या घरचे वातावरण, लोकही जुळवून घेणारी असायला हवी’ असे आपले विचार होते. या सगळ्यात योग्य मुलगा शोधणे एक अवघड काम होवून बसले होते. भिशीतल्या रमा ताईंनी ‘ स्थळ ‘ बद्दल सांगितलं नसतं तर हा शोध कधी पूर्णही झाला नसता. त्यांच्यामुळे आपण ‘ स्थळ‘ वर श्रेयाची नाव नोंदणी केली. तिच्यासाठी योग्य अशी अनेक स्थळं सुचवल्या गेली . सुचवलेल्या स्थळांबद्दल सगळी माहिती दिल्या गेली. श्रेया आणि आपल्याला योग्य वाटलेल्या स्थळाशी भेटून , बोलून मिळालेल्या माहितीची खात्री करून घेता आली . एक मुलगा पसंतही पडला होता. सगळी बोलणी झाली होती पण ऐनवेळी श्रेयाला काही गोष्टींबद्दल खात्री वाटेना तेव्हा तिने नकार दिला . तिने दिलेला नकारही ‘ स्थळ‘ ने सकारात्मकतेने घेतला . इतर योग्य स्थळं सुचवली. तिची खात्री पटल्याशिवाय कसलीही घाई केली नाही की आपल्यावर कोणतीही सक्ती केली नाही. ‘ स्थळ ‘ स्वतः “लग्न म्हणजे आयुष्यातला खूप महत्त्वाचा निर्णय आहे. तेव्हा जोडीदार निवडतांना कसलीही तडजोड नको” या मताचे आहे .

या सगळ्यांचा परिणाम म्हणून समीर सारखा गुणी मुलगा आपल्याला जावई म्हणून मिळाला. त्याच्या घरचे वातावरण , लोकही अगदी आपल्यासारखी आहेत . श्रेयाला लग्नानंतर त्या घरात रुळायला मदतच होईल . असे विचार सुरू असतांनाच दारावरची बेल वाजली. दरवाजा उघडला तर भिशीच्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या. सगळ्यांच हसून स्वागत केलं. गप्पा गोष्टी रंगल्या . खाणं पिणं सुरू असतांनाच टेबलवर ठेवलेला समीरचा फोटो बघून मैत्रिणी म्हणाल्याच, ” भावी जावई का ? “

सविताने ही मग समीरचं तोंड भरुन कौतुक केलं. लग्न ठरल्याचे पेढे दिले. तेवढ्यात श्रेयाला घरापर्यंत पोहचवायला आलेला समीरही सगळ्यांना भेटला. त्याच्याशी भेटून बोलून सगळ्या मैत्रिणींचीही खात्री पटली की रमाने सुचवल्या ‘ स्थळ ‘ ने खरंच श्रेयासाठी योग्य मुलगा जोडीदार म्हणून मिळवून दिला आहे.

पुढच्या भिशीमधे लग्नासाठी रुखवत काय काय करायचा ? हे ठरवायचं कबुल करून सगळ्यांनी हसून निरोप घेतला.तुम्हालाही चांगला जावई किंवा सून मिळवायची असेल. आपल्या पाल्यासाठी योग्य जोडीदार हवा असेल तर एकदा ‘ स्थळ ‘ ला नक्की भेट द्या.

SthalTales#Story7

आज काव्या फारच आनंदात होती . प्री वेडिंग शूटसाठी अनिकेत तिला घ्यायला येणार होता. दोघांनी मिळून खूप छान थीम ठरवली होती. खरं तर प्री वेडिंग शूट तिचं स्वप्न होत पण अनिकेतच्या घरच्यांना आवडणार नाही असं वाटून ती गप्प होती. अनिकेतशी बोलता बोलता सहज हा विषय निघाला आणि अनिकेतनेच पुढाकार घेतला म्हणून हे शक्य झालं होत.

ठरल्या वेळी तो सर्व तयारीनिशी हजर झाला. दोघंही ठरलेल्या ठिकाणी पोहचली. फोटोग्राफर आधीच तिथे पोहचला होता. सकाळची वेळ , सगळीकडे हिरवळ , हवेतला गारवा , सोबतीला अनिकेत …. तिचं मन अगदी प्रसन्न झालं.

अनिकेतला फोटो काढण्यात अजिबात रस नाही हे त्याने तिला एकदा सांगितलं होतं तरी केवळ आपल्यासाठी तो पुढाकार घेऊन शूटसाठी तयार झाला याचं तिला नवल वाटलं होतं. शूट दरम्यानही तो सतत तिची काळजी घेत होता . खूप सुंदर फोटो काढले . सगळं आवरून ते परतीच्या तयारीत होते. अजून थोडा वेळ असच एकमेकांच्या सहवासात घालवता यावे म्हणून अनिकेतने तिला जवळच्याच ढाब्यावर जेवायला नेले . गाडीतून उतरल्यावर ढाब्याकडे जातांना अचानक काव्याचा पाय साडीत अडकला आणि तिचा तोल गेला . आपण खाली पडणार म्हणून तिने डोळे गच्च मिटून घेतले पण तेवढ्यात अनिकेतने तिला सावरले. आयुष्याच्या वाटेवरही अनिकेत असाच सावरून घेईल अशी तिला खात्रीच पटली. मनोमन तिने ‘ स्थळ‘ चे आभार मानले . झरझर वर्षा पूर्वीचा भूतकाळ तिच्या नजरेसमोरून गेला. काव्या दिसायला सावली तरी नाकी डोळी नीटस. पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं पण तिला पूर्ण वेळ नोकरी करण्यात रस नव्हता. लग्नानंतर नोकरी न करता घर सांभाळावं, साजवावं, आल्या गेल्यांचं आनंदाने करावं. नवऱ्याने काम करून थकून यावं आणि आपण नीटनेटक्या घरानिशी हसून त्याच स्वागत करावं. असं तिचं स्वप्नं होत. काम केलं तर तेही केवळ पैसा मिळावा म्हणून नाही तर आपला आत्मविश्वास टिकून रहावा म्हणून. घर सांभाळून करता येईल तेच करायचं. लग्नानंतर नोकरीच केली पाहिजे अशी सक्ती नसावी. अस तिचं मत होतं. खरं तर गृहकृतदक्ष बायको सगळ्यांनाच हवी असते पण ती नोकरीही करणारी असली तर उत्तम. अशीच सगळ्यांची अपेक्षा होती. त्यामुळे कोणतेही स्थळ तिला होकार देत नव्हते. आपल्या पागाराकडे पाहून लग्न करणारा मुलगा तीला नकोच होता. योग्य मुलगा मिळेपर्यंत थांबायचं तिने पक्क केलं होतं.

सहजच तिने ‘ स्थळ ‘ वरही नोंदणी केली होती. तिथेच अनिकेत बद्दल तिला माहिती मिळाली. प्रत्यक्ष भेटल्यावर अनिकेतचे आणि तिचे विचार जुळत होते याची खात्री पटली. बायकोने नोकरी केलीच पाहिजे अशी त्याची सक्ती नव्हती आणि नोकरी करायचीच असली तरी त्याला त्याची ना ही नव्हती . तिच्या निर्णयाचा आदर पूर्वक स्वीकार केला जावा असे त्याचे मत होते.

कार्यक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या निर्णयात तो तिच्या मताला महत्त्व देत होता . तिला तिचे मत मांडण्यासाठी प्रेरित करत होता . त्याच्या वागणुकीतून जाणवत होत की,’ तो इतरांवर स्वतःची मतं लादत नाही उलट इतरांच्या मताचाही आदर करतो , काळजी घेतो , स्वतः च्या जबाबदाऱ्या टाळत नाही’. तिला जसा जोडीदार हवा अगदी तसाच अनिकेत होता आणि केवळ ‘ स्थळ ‘ मुळेच हे शक्य झालं होत.

असे विचार तिच्या मनात सुरू होते आणि तिने हळूच पर्स मधून खास अनिकेतसाठी स्वतः भरत काम केलेल्या सुंदर कोरीव ‘ A’ अक्षराच्या रुमालांच सेट अनिकेतला भेट म्हणून दिला. त्या रुमालावरचे सुंदर भरतकाम आणि त्यासाठी घेतलेली मेहनत बघून त्याला काव्याच्या प्रेमाची जाणिव नव्याने झाली . तो आनंदाने हसला आणि तिला म्हणाला ,’ तुझं हे असं प्रेम व्यक्त करणचं मला खूप आवडत. तुझी माझी भेट घडवून दिल्या बद्दल ‘ स्थळ ‘ चे मानू तेवढे आभार कमीच आहेत ” . ती सुंदर लाजली कारण तिलाही त्याचं म्हणणं मनोमन पटलं होत.

SthalTales #Story6

नेहाच्या सगळ्या मैत्रिणींचे लग्न झाले. संसार सुरू झाले तरी तिच्या लग्नाचा योग जुळून येत नव्हता. अनेक नातेवाईकांनी लग्न लवकर जुळत नाही म्हणून वाट्टेल तशी स्थळ सुचवली. “योग्य नसलेल्या मुलाशी लग्न करून आयुष्य वाया घालवण्यापेक्षा मी लग्नच करणार नाही” असं तिन बजावून सांगितले तरी ” तडजोड करावीच लागते ” अशी प्रतिक्रिया देवून स्थळ सुचवणे सुरूच होते.

प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने लग्नाचा योग पुढे ढकलला जात होता. नेहा रोज रोजच्या चर्चेला कंटाळून गेली होती. घरच्यांनी तर ,” तुला एखादा मुलगा पसंत असेल तर तस सांग आपण त्याचा ही विचार करू ” असं सांगून टाकलं. इतकी वर्षे फक्त उत्तम शिक्षण घेण्यावर भर दिला . चांगली नोकरी मिळाली तेव्हा त्यात पुढे जाण्यासाठी कामात स्वतःला बुडवून घेतल. आता असं अचानक आपल्याला कोणता मुलगा पसंत आहे म्हणून कसं सांगायचं ? तिला तर लग्न हा विषयच नकोसा झाला.

लग्नाबद्दल तिची काही स्वप्न होती. जोडीदाराबद्दल तिच्या काही अपेक्षा होत्या. त्या सगळ्यांना विचारात न घेता केवळ लग्न करायचं आहे म्हणून करायचं हे तिला मान्य नव्हतं. आयुष्यातला इतका महत्त्वाचा निर्णय केवळ लोकांच्या आग्रहाला बळी पडून घेण्यात तिला अजिबात रस नव्हता.

येणाऱ्या स्थळांमध्ये काहींना तिचे शिक्षण जास्त वाटायचे , काहींना तिची नोकरी नको असे , काहींना तिच्या उंचीचा त्रास , काहींना तिच्या रंगाचा , काहींना सगळं योग्य वाटलं तरी तिने घर उत्तम सांभाळून नोकरी करावी आणि पगार मात्र घरच्यांच्या स्वाधिन करावा अशा अवास्तव अपेक्षा. अनेकांनी तिला होकार दिला होता ते केवळ तिचा गलेलठ्ठ पगार बघूनच. या सगळ्यात तिला काय हवंय, तिच्या अपेक्षा काय याचा कोणीच विचार करत नव्हतं आणि नेमकी तिला हेच खटकत होतं. अनेकदा नात्यातली स्थळ असल्याने तिने नकार दिल्यावर दुखवलेल्यांनी तिचीच बदनामी केली. या सगळ्यांचा परिणाम म्हणून तिने लग्न या विषयावर बोलणेच बंद केले.

ऑफिस मधे सहकारी असलेल्या पूजा या मैत्रिणीचे लग्न ठरले. तिने साखरपुड्याचे आमंत्रण देत लाडू दिले तेव्हा सगळ्यांनी नेहालाही ती कधी लाडू देणार आहे असे चिडवले. तेव्हा तिने ते हसण्यावर नेल पण नंतर तिची चिडचिड झाली. तिची चिडचिड बघून पूजाने तिला तिच्या चिडण्याचे कारण विचारले.’ मुलगा मनासारखं मिळेपर्यंत थांबण्याची माझी तयारी आहे पण सतत लोक जेव्हा लग्न , त्यात कराव्या लागणाऱ्या तडजोडीबद्दल बोलतात, लग्न झालं की होत सगळं नीट असा खोटा दिलासा देतात , येईल त्या स्थळाला होकार देण्यासाठी आग्रह धरतात तेव्हा चिडचिड होते ” असं नेहानेही मोकळेपणाने सांगितलं . तेव्हा पूजा पट्कन बोलून गेली ,” बस एवढंच ना , तुला हवा तसा मुलगा मिळण्यासाठी ” स्थळ ” नक्कीच मदत करेल. इथे तुझी आवड आणि अपेक्षा बघून तुला अनेक पर्याय सुचवले जातात. त्यातील तुला जो पर्याय योग्य वाटेल त्याबाबतीत तुला हवी असलेली सगळी माहिती दिली जाते . खात्री पटेपर्यंत तूला विचार करायला वेळ दिला जातो. निर्णय घेण्यासाठी कोणतीही घाई केली जात नाही. यानंतरही काही कारणाने तुला नकार द्यायचा असेल तर त्यावरही कसलीच हरकत घेतली जाणार नाही. उलट तुझ्या मतांचा पूर्ण आदर करून इतर पर्याय सुचवले जातात. तेव्हा तू एकदा ‘ स्थळ‘ ला नक्की भेट दे. तुझी समस्या नक्की दूर होईल.”

नेहाने तरी शंका घेतलीच,” स्थळ बद्दल तुला एवढी माहिती कशी मिळाली ” त्यावर पूजाने तिला डोळा मारून सांगितलं ,” मला राहुल या ‘ स्थळ ‘ मुळेच तर मिळाला आहे “.

राहुल पूजासाठी सर्व प्रकारे योग्य मुलगा होता . नेहा अनेकदा त्याला भेटली होती . पूजाने आज सांगितलं म्हणून कळलं नाहीतर तर ती त्या दोघांचे लव्ह मॅरेज आहे असंच समजत होती.

त्या दोघांकडे बघून तिला ‘ स्थळ‘ बद्दल खात्री पटली. तिनेही तातडीनं ‘ स्थळ’ वर तिची नाव नोंदणी केली. ‘निवड तुमची विश्वासार्हता आमची ‘ ही टॅग लाईन वाचल्यावर तर ती अगदी निश्चिंत झाली.

नेहासारखे तुम्हालाही निश्चिंत व्हायचे असेल तर ‘ स्थळ‘ ला एकदा भेट द्याच . कारण पर्याय जरी आमचे तरी पसंती तुमचीच….

Download Sthal Marathi Matrimony App Now

Download the app and create your profile for FREE.
Find your compatible life partner with Sthal Marathi Matrimony

Sthal Matrimony Mobile App