SthalTales#Story16

शशांक कॅनडाहुन भारतात आला तो फक्त लग्नासाठी मुली पाहायलाच. उच्चशिक्षित शशांक आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. फार्मसी इंडस्ट्रीत डॉक्टरेट करून कॅनडाच्या एका अतिशय नामांकित कंपनीत वरच्या हुद्यावर कार्यरत. नुकतंच एकोणतीस ओलांडून तिशीत प्रवेश. पूर्ण शिक्षण नाशिक मध्ये झालेले. आई विदुला नाशिक च्या कॉन्व्हेंट शाळेत शिक्षिका तर वडील श्रीकांत सरकारी कार्यालयात उच्चपदस्थ स्थानावर. त्यांचा नाशिकला स्वतःचा बंगला तर पुण्यातही 3Bhk चा टुमदार फ्लॅट. एकंदर कुटुंबाची आर्थिक बाजू अतिशय भक्कम.

श्रीकांत आणि विदुला यांनी ठरवलेच होते शशांकचे लग्न येत्या सहा महिन्यात पार पाडून मुलाच्या जबाबदारीतून मोकळे व्हायचे. लग्न होऊन वर वधू कॅनडा ला जातील. उच्चशिक्षित कुटूंब असल्याने मुलगी शोधायला काहीच अडचण येणार नाही असा विचार. नातेवाईक तर म्हणाले शशांक नुसता उभा राहूदे मुलींची कशी लाईन लागते की नाही बघाच.

उत्साहात स्थळं पाहायला सुरुवात केली. पण एका आठवड्यातच अडचण जाणवू लागली. मुलींच्या पालकांना एकतर कॅनडात मुलीने राहू नये अशी अपेक्षा होती तर काहींना शशांकचे शिक्षण,कंपनी याविषयी शंका. कारण इंजिनीरिंग केलेले IT त काम करणारे मुलगे सर्वमान्य असतात.

या कारणामुळे शशांक ची अपेक्षा होती की मुलीच्या आणि माझ्या अपेक्षा जुळाव्यात तसेच पालकांनाही एकमेकांच्या अपेक्षा आधीच कळाल्या तर एकमेकांना भेटणे सोपे होईल. तसेच मुलगी नाशिक मध्ये असेल तर उत्तमच.  शशांक ने ही अडचण त्याचा मित्र अजिंक्यला सांगितली. अजिंक्य ने लगेच स्थळ मॅट्रिमोनी विषयी सांगितले. या संकेतस्थळावर शशांकने आपली सगळी माहिती रजिस्टर केली व फोटोही अपलोड केला. मुलीकडून काय अपेक्षा हे ही सविस्तर लिहिले. आणि एका आठवड्यातच  सायली चे स्थळ आले. नाशिक मध्येच शिक्षण झालेले. दोघांचे प्रोफाइल ही जुळले. फोटोत शशांकला सायली आवडलीच होती. विदुला ने फोनवर सगळी चौकशी केली तर सायली लग्नानंतर  कॅनडा त सेटल व्हायला तयार होती तसेच तिने इंजिननेरिंग केल्याने तिला कॅनडात नोकरीच्या अनेक संधीही होत्या. सायली नेही शशांकला भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे कळवले. नाशिकमध्येच असल्याने दोघेही दुसऱ्याच दिवशी भेटले. सायलीचा भाऊ फार्मा इंडस्ट्रीतच असल्याने शशांकच्या कामाविषयी कोणालाच कसलेच प्रश्न नव्हते. शशांक आणि सायली पहिल्या भेटीतच दोघांचेही विचार व अपेक्षा जुळल्या.

एका महिन्यात त्यांचे लग्नही झाले. आता दोघे कॅनडात सुखाने संसार करत आहेत. त्यांचे प्रोफाइल जुळवण्यात स्थळमॅट्रिमोनिची खूप मोलाची मदत झाली. देश असो वा विदेश स्थळ मॅट्रिमोनि मुळे कुठूनही योग्य स्थळांची माहिती मिळते. व तेही अगदी घरबसल्या…नक्की एकदा भेट द्या.

SthalTales#Story15

“अरे असं लोकांच्या लग्नात किती दिवस नाचणार आहेस? स्वतःच्या लग्नाचं बघ की जरा…”

सर्वेशला त्याचा मित्र म्हणाला आणि ते ऐकून सर्वेश फक्त हसला. त्याला आता या वाक्यांची सवय झाली होती. सर्वेश म्हणजे एक साधा सरळ मुलगा. इतरांप्रमाणे लग्न करावं आणि सुखाने संसार करावा अशी त्याचीही माफक अपेक्षा होती परंतु बऱ्याच प्रयत्नानंतर सुद्धा त्याचं लग्न जुळत नव्हतं. साहजिक आहे, आजकालच्या काळात लहानश्या गावात राहणाऱ्या आणि शेतीवाडी बघणाऱ्या सरळ स्वभावाच्या मुलाला कोण मुलगी देणार?

सर्वेशचे आईवडील गावातील अतिशय सज्जन जोडपे म्हणून ओळखले जात असे. त्यांनी आपल्या मुलासाठी अनेक मध्यस्थांतर्फे मुलगी बघण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येकवेळी त्यांना अपयशच आले. मुलींना मोठ्या कंपनीत अधिकारी असणारा किंवा सरकारी नौकरी असणारा, शहरात राहणारा नवरा असावा अशी अपेक्षा असायची आणि सर्वेश त्यांच्या अपेक्षेमध्ये बसत नसे.

एके दिवशी सर्वेशचा बालमित्र संजय त्याच्या घरी आला. संजय आयटी कंपनीत जॉबला होता. नुकतेच त्याचेही लग्न ठरले होते आणि लग्नाची पत्रिका देण्यासाठीच तो आला होता. पत्रिका स्वीकारताना सर्वेशच्या चेहऱ्यावरची निराशा संजय पासून लपली नाही. शेवटी त्याने विचारलेच,

“काय झालं मित्रा? एवढा निराश का दिसतो आहेस?”

“आता तुझ्यापासून काय लपवणार संजय? तू बघतोच आहेस माझ्या लग्नासाठी किती प्रयत्न सुरू आहेत पण कुठे जुळतच नाही.”

संजय म्हणाला, “अरे पण तू स्थळ मॅट्रिमोनीवर प्रयत्न केलास का? माझंही लग्न त्याच साईटवरून जुळलं आहे”

“हे स्थळ काय आहे?”

मग संजयने सर्वेशचा मोबाईल घेतला आणि त्याला स्थळ मॅट्रिमोनीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून दिले. त्याची प्रोफाइल त्यावर बनवली आणि ऍप कसे वापरायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले.आतापर्यंत एवढे प्रयत्न केलेच आहेत तर हा पण प्रयत्न करून बघू असे सर्वेशच्या मनात आले.

नीता एक अतिशय हुशार मुलगी. नीता शहरात राहत असली तरी तिला शेतीवाडीचे आकर्षण होते. ऍग्रीकल्चर विषयामध्ये डिग्री मिळवली असल्याने शेतात नवनवीन प्रयोग करण्यास ती इच्छुक होती. तिला जोडीदार हा शेती करणाराच हवा होता कारण तिच्या वडिलांकडे शेती नव्हती. नीताच्या वडिलांना नीताच्या लग्नाची नेहमी काळजी वाटत असे. तिला अनुरूप शेतकरी जोडीदार मिळेल का आणि मिळाला तर तो कसा असेल याचाच ते नेहमी विचार करत असत. त्यांनी नीताचे स्थळ मॅट्रीमोनीवर प्रोफाइल बनवून ठेवले होतेच. एके दिवशी सहज स्थळची साईट उघडून पाहिले असता त्यांना सर्वेशचे प्रोफाइल दिसले. सर्वेश हा नीताला अनुरूप जोडीदार ठरू शकतो हे त्यांच्या अनुभवी नजरेस चटकन लक्षात आले आणि त्यांनी आनंदित होऊन नीताला सर्वेशचे प्रोफाइल दाखवले.

देखणा, रांगडा सर्वेश बघताक्षणीच नीताला आवडला आणि तिने तिच्या वडिलांना पुढील बोलणी करण्यासाठी होकार दिला. मग स्थळ मॅट्रीमोनीच्या माध्यमातून रीतसर सर्वेशला संपर्क केला गेला. त्याला तर विश्वासच बसेना! ऍप डाउनलोड करून अवघे दोनच दिवस झाले असताना मुलीचे वडील स्वतः संपर्क करत आहेत ही बातमी त्याने त्याच्या आईवडिलांना सांगितली. मग नीता तिच्या पालकांसह सर्वेशच्या गावी त्याला भेटण्यास आली. अर्थातच, तिच्या ज्या अपेक्षा होत्या त्या सर्व अपेक्षा सर्वेश पूर्ण करत होता.

यथावकाश दोघांचे लग्न झाले आणि नीता व सर्वेश सुखी संसाराला लागले. नीताच्या शिक्षणाला आणि नवनवीन प्रयोग करण्याच्या स्वभावाला सर्वेशच्या कष्टाळू स्वभावाची जोड लाभली. आज ते दोघे प्रगतिशील शेतकरी जोडपे म्हणून सगळीकडे ओळखले जातात. पण त्यांची ओळख करून देणाऱ्या स्थळ मॅट्रीमोनीला मात्र ते विसरले नाहीत. प्रत्येक लग्नाळू तरुण तरुणीला ते स्थळचे ऍप डाउनलोड करून त्यावर प्रोफाइल बनवण्याचा सल्ला देतात आणि स्वतःचे उदाहरण देऊन आवर्जून सांगतात…

“अपेक्षा कश्याही असो, अनुरूप जोडीदार भेटतात फक्त आणि फक्त स्थळ मॅट्रीमोनीवरच!”

SthalTales#Story14

चौकोनी कुटुंब असलेल्या शरद काकांना त्यांच्या सुप्रियासाठी चांगले स्थळ शोधतांना खूप अडचणी येऊ लागल्या. त्यांची नोकरी कायम फिरस्तीची असल्याने समाजात फारस कधी मिसळता आलं नाही. मोजक्याच नातेवाईकांशी संपर्क होता त्यामुळे खूप जनसंपर्क निर्माण झाला नाही. आयुष्यातील अनेक वर्ष घर आणि नोकरी एवढंच विश्व झालं होतं. आज जेव्हा सुप्रिया लग्नाची झाली तेव्हा त्यांना समाजाची , सामाजिकतेची प्रकर्षाने उणीव भासू लागली. खूप प्रयत्न करूनही चांगल्या स्थळांशी ते संपर्क साधू शकत नव्हते.

त्यांच्याशी परिचय कमी असल्याने मध्यस्थ म्हणून ही फार कोणी पुढे यायला तयार होत नसे. त्यांना निराशेने ग्रासलं . एक दिवस अचानक त्यांना स्थळ अँप विषयी माहिती मिळाली.

त्यांनी ते अँप डाऊनलोड केले. त्यांनी दिलेल्या माहितीला अनुसरून स्थळ अँप सुप्रियासाठी योग्य स्थळं सुचवू लागले . त्यांच्यासाठी एका उत्तम मध्यस्थाची भूमिका आता स्थळ अँप निभावू लागले.

तुम्हालाही मध्यस्थाची उणीव भासत असेल तर स्थळ अँप डाऊनलोड करा कारण

या समस्येवर उपाय म्हणून ‘ स्थळ’ तुमच्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावतं. स्थळ चे अँप डाऊनलोड करून इथे तुमची सविस्तर माहिती द्यायची. तुम्ही दिलेल्या माहितीला जुळणारी अनेक योग्य स्थळं इथे सुचवली जातात. त्यातून एकमेकांना पसंत पडलेल्या स्थळांचा एकमेकांना परिचय करून देत सविस्तर माहिती दिली जाते.

एवढं सगळं झालं तरी अखेर तुमच्या पसंतीला , निर्णयाला प्राधान्य दिलं जातं. या प्रक्रियेत तुम्ही तुम्हाला सुचवलेल्या स्थळाबाबत जरा जरी साशंक असला तरी नाही म्हणण्याचं तुमचं स्वतंत्र अबाधित ठेवलं जातं.

तेव्हा सगळे किंतू परंतू मनातून काढून टाका. मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरवण्यासाठी इतर कोणावरही अवलंबून राहू नका . ‘ स्थळ ‘ वर नाव नोंदणी करून निश्चिंत रहा कारण

” मध्यस्ती ‘ स्थळ’ची …. पसंती तुमचीच”

SthalTales#Story13

सावळ्या दिप्तीचे लग्न किशोर सारख्या रुबाबदार मुलाशी झाले तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.

तिच्या काही मैत्रिणींना तिचा हेवा ही वाटला.

दिप्तीला आणि तिच्या आई वडिलांना लोकांनी कायम तिच्या रंगावरून ऐकवलं. दिप्तीचं लग्नाचं वय झालं तसे तर सगळेच वाटेल ते सल्ले देवू लागले. मुलगी सावळी म्हणजे एक तर कोणताच मुलगा पसंत करणार नाही. कोणी पसंत केलंच तर त्याला नाही म्हणण्याचा दिप्तीला अधिकार नाही.

दिप्तीच्या घरातलं वातावरण अगदीच तंग झालं. आपल्या मुलीलाही तिचा जोडीदार निवडण्याचा अधिकार मिळायला हवा या विचाराने आईवडील दोघेही अस्वस्थ झाले. लहानपणापासून त्यांनी समाजाने कितीही सांगितलं तरी तिच्या रंगला महत्त्व दिले नव्हते. तिला योग्य शिक्षण मिळावे , ती स्वतःच्या पायावर उभी राहावी यासाठीच प्रयत्न केले. दिप्तीही बुध्दीने तल्लख होती. सगळ्या कामात उत्तम गती होती. उच्च शिक्षण चांगल्या गुणांनी तर पूर्ण केलच पण चांगल्या पगाराची नोकरीही मिळवली.

ती स्वभावानेही अगदी मनमिळावू होती. केवळ रंगाने तिच्यावर अन्याय व्हावा हे तिच्या वडिलांना मान्य नव्हते . इतरांच्या सल्यांना दुर्लक्षित करून त्यांनी ‘ स्थळ ‘ चे अँप डाऊनलोड केले. त्यावर दिप्तीची सगळी माहिती दिली.

दिप्तीच्या माहितीला साजेशी अनेक उत्तम स्थळ ‘ स्थळ ‘ अँप कडून सुचवली जावू लागली. हे अँप तुम्ही अमुक एक स्थळच निवडावे अशी सक्ती तुमच्यावर करत नाही. सुचवलेल्या स्थळांना नाही म्हणण्याच स्वातंत्र्य तर तुम्हाला देतेच पण तुम्हाला पसंत पडेपर्यंत इतर अनेक योग्य स्थळांचे पर्याय उपलब्ध करून देते. यातच त्यांना किशोरचे स्थळ सुचवल्या गेले होते. किशोरला दिप्ती पसंत होती. त्याने तिच्या रंगापेक्षा तिच्या अंगी असलेल्या गुणांना महत्त्व दिले होते. किशोरला भेटल्यावर दिप्तीलाही जाणवू लागले होते की तो तिच्या मतांचा आदर करतो. तिने तिच्या कार्यक्षेत्रात प्रगती करावी म्हणून प्रेरणा देतो. एवढंच नाही तर त्याच्या घरच्यांनाही दिप्तीबद्दल , तिच्या कामाबद्दल कौतुक होत.

दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय पक्का केला तेव्हा दोन्ही कुटुंब आनंदून गेली. लग्न धुमधडाक्यात पार पडले.

अरेंज मॅरेज सारख्या पारंपारिक पद्धतीतले काही अनावश्यक ठोबळ नियम मोडत दोघांनी आपल्या पसंतीचा जोडीदार निवडला होता तो केवळ ‘ स्थळ ‘ अॅपमुळेच.

प्रत्येकाला आपल्यासाठी योग्य असलेल्या जोडीदाराची निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे . तुम्हालाही योग्य जोडीदार निवडायचा असेल तर आजच स्थळ अँप डाऊनलोड करा आणि चिंता मुक्त व्हा….. कारण

” स्थळची फक्त मध्यस्ती करते….. पसंती अखेर तुमचीच असते.”

SthalTales#Story12

सावंत वहिनी जिना चढत असताना पायरीवर बसलेल्या बायकांची कुजबूज त्यांच्या कानावर पडली.

“यांच्या सईचं कुठे बाहेर आहे वाटतं ?”

“मग तिनं सरळ सांगावं नं आईला?”

“वय होत आलं नं सईचं.”

“मुलींची लग्न कशी वेळच्यावेळी व्हायला हवीत.”

“आमच्या क्षमाचं नाही का बावीसाव्या वर्षी लग्न केलं आम्ही.

एका वर्षात गोरागोमटा नातूपण मिळाला.”

“खरंच गं बाई भाग्याची तू.”

सावंत वहिनींना फार वाईट वाटलं. त्या कधी असं मागून कुणाविषयी बोलत नसत. आणि या शेजारणी ज्यांना त्या गावी गेल्या की आठवणीने काजूआंब्याची भेट आणून द्यायच्या ,कधी छान मालवणी रेसिपी बनवली तर शेजारपाळं द्यायच्या त्याच आज त्यांच्या सईबद्दल कुजबुजत असलेलं पाहून त्यांना फारच दु:ख झालं.

घरी येऊन थोडा वेळ सोफ्यावर लवंडल्या तोच त्यांना अंधारल्यासारखं झालं तसं त्यांनी फेमिली डॉक्टरांना फोन लावला. डॉक्टर त्यांचे पेशंट संपवून थोड्या वेळात आले. त्यांनी सावंत वहिनींच बीपी चेक केलं. बीपी फारच वाढलं होतं. डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या व म्हणाले नुसत्या गोळ्या घेऊन उपयोग नाही. तुम्ही कसलातरी मानसिक ताण घेतलाय तो कमी झाला पाहिजे.

सावंत वहिनी म्हणाल्या,”काय सांगू डॉक्टर, सईचं लग्नच कुठे जमत नाहीए. त्यामुळे मला खूप टेंशन आलंय. एकतर ती काळसावळी त्यामुळे कोणाच्या पसंतीस उतरत नाही. त्यात आजुबाजूचे तिचं बाहेर काहीतरी असेल म्हणून कुजबुजतात.”

डॉक्टर म्हणाले,”आजुबाजूच्यांच काय एवढं मनावर लावून घेता. चालायचच ते. जित्याची खोड..”

सईचं नाव आपण ‘स्थळ मेट्रीमोनी‘वर रजिस्टर करा.

तिचं वय,जन्मतारीख,शिक्षण,व्यवसाय ,अपेक्षा,रंग,उंची..

सगळं तिच्या प्रोफाईलमध्ये लिहा. ‘स्थळ मेट्रीमोनी’ आपल्या वेळेची काळजी घेते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हे संकेतस्थळ बनवलेलं आहे. माझ्या बऱ्याच मित्रांच्या मुलांची लग्न जमवण्यात स्थळ मेट्रीमोनी’चा मोलाचा वाटा आहे. आमच्या शुभदाचंही मी ‘स्थळ मेट्रीमोनी‘वर प्रोफाइल बनवायचं ठरवलंय.”

डॉक्टर निघून जाताच सावंतवहिनींनी सईला ‘स्थळ मैट्रोमोनी‘विषयी फोनवरून सांगितलं.

सईने स्थळ मेट्रीमोनीच्या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन केलं व प्रोफाईलमध्ये तिची माहिती लिहिली. लग्नानंतरही नोकरी करणार असल्याचं स्पष्ट नमूद केलं.

या संकेतस्थळावर शोध घेत असताना तिच्या मनाजोगता जोडीदार ‘प्रविण’ तिला दिसला. दिसताक्षणी मनात भरावा असा. त्याच्या रंगाविषयी काही अपेक्षा नव्हत्या. ‘बाह्य रंगापेक्षा अंतरंगावर माझा जास्त विश्वास आहे’असं त्याने प्रोफाईलवर लिहिलं होतं. सईला प्रविणचं प्रोफाईल फार आवडलं. पुढे त्यांचं लग्न जुळवण्यात ‘स्थळ मेट्रीमोनी‘ने मोलाची मदत केली.

सावंत वहिनींनी त्यांच्या अजून दोन चार मैत्रिणींना स्थळ मेट्रीमोनी‘विषयी आवर्जून माहिती दिली.

SthalTales#Story11

सुरेश काकांना पीहू ही एकुलती एक कन्या. काकूंच्या माघारी त्यांनी पीहुला अतिशय लाडात वाढवले आहे. चांगल्या शिक्षणा सोबतच चांगले संस्कारही दिलेत. पीहूचं त्यांचं जग आहे. पीहूला नोकरी लागली तेव्हा काकांना खूप आनंद झाला पण त्याच बरोबर तिच्या लग्नाबद्दल काळजीही वाटू लागली. पीहूचं लग्नाचं वयही झालंच होतं. अनेक चांगली स्थळं ही सांगून येत होती पण पीहूला एकही स्थळ पसंत पडेना.

पीहूची अटच तशी होती. लग्नानंतर सासरच्या लोकांना आपलंसं करण्याची , त्यांची जबाबदारी घेण्याची पीहूची तयारी होती पण तिच्या जोडीदाराने ही तिच्या वडिलांचं करतांना मनापासून करावं एवढीच तिची अपेक्षा होती . त्याला कारणही तसंच होतं , गेली अनेक वर्षे काका फक्त पीहूसाठी झटत होते. लग्नानंतर ते एकाकी पडू नये म्हणून पीहूने तशी अट घातली होती.

काही मुलांना पीहूची अट मान्य असली तरी त्यांच्यां घरच्यांना पीहूची ही अट त्रासदायक वाटायची. अनेक स्थळ येवूनही पीहूचं लग्न काही ठरत नव्हतं. काकांनी तिला खूप समजावलं की ,” अशी अट घालू नकोस . माझं मी करायला समर्थ आहे “. पण पीहू ऐकायला तयार नव्हती .

काकांना दिवसेंदिवस पीहूच्या लग्नाची चिंता अधिकच सतावू लागली. ही चिंता आता त्यांच्या चेहऱ्यावरही दिसू लागली. आता तर पीहूची अट ऐकल्यामुळे तिच्यासाठी योग्य स्थळं सुद्धा येतं नव्हती.

एक दिवस काका सकाळी मॉर्निंग वॉकला म्हणून घराबाहेर पडले पण त्यांचं मन चालण्यात काही लागेना . त्यांनी बागेतल्या बाकावर बसून घेतलं. विचाराच्या तंद्रीत ते शून्यात नजर लावून बसले. त्यांचे मित्र त्यांना या अवस्थेत पाहून त्यांच्या जवळ येवून बसले. काकांच्या समस्येचं कारण जाणून घेतल्यावर त्यांच्या मित्रांपैकी एक असलेल्या सदा काकांनी लगेच स्वत:च्या मोठ्या भावाला फोन लावला आणि त्यांनी लग्न ठरवण्यासाठी जे अँप download केलं होतं त्याची सगळी माहिती घेतली.

ती माहिती घेतल्यावर सदा काकांचा चेहरा तर खुललाच सोबत आता आपला मित्र ही चिंता मुक्त होणार याची खात्री पटली. सहा महिन्यापूर्वीच त्यांच्या पुतणीच लग्न झालं होतं त्या लग्नाबद्दल , नवीन जावयाबद्दल, त्याच्या घरच्यांबद्दल सदा काका नेहमी भरभरून कौतुक करायचे.

त्यांच्या मोठ्या भावाला त्यांची मुलगी सायलीसाठी अगदी योग्य स्थळ मिळाले होते. पीहूलाही तिच्या योग्यतेचे स्थळं मिळावे अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती.

त्यामुळे आता सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सदा काकांनी भावासोबत झालेलं संभाषण सांगायला सुरुवात केली ,” दादाने सायलीचे लग्न ठरवतांना मदत करणारे ‘ स्थळ‘ चे नवीन अँप download केले होते. त्यावर सायलीची सगळी माहिती दिली . बस्…. मग काय तिच्या माहितीला जुळणाऱ्या अनेक योग्य मुलांची नावे ‘ स्थळ ‘ कडून सुचवली जावू लागली. आपण ‘ स्थळ ‘ ने सुचवलेल्या स्थळांना नकार दिला तरी ते इतर अनेक योग्य स्थळांचे पर्याय उपलब्ध करून देतात. स्थळ निवडतांना तुम्हाला हवा तितका वेळ तुम्ही घेवू शकता. तुमच्यावर कसलीही सक्ती केली जात नाही. कारण ” आपलं समाधान हिच त्यांच्या योग्यतेची पावती” ते मानतात.

सुचवलेल्या स्थळांमधून समीर यांचे स्थळ आमच्या घरात सगळ्यांनाच पसंत पडले . त्यांच्या घरच्यांनाही सायली फार आवडली . आज दोघंही आनंदाने संसार करत आहेत. अजून काय हवं?” इतर मित्रांना सदा काकांमुळे ‘ स्थळ ‘ बद्दल उपयुक्त माहिती मिळाली. त्यांचं बोलणं ऐकून सुरेश काकांनी तर लगेच ‘ स्थळ ‘ च अँप डाऊनलोड केले.

तुम्हालाही आपल्या पाल्याच्या लग्न संदर्भात चिंता सतावत असेल तर वाट कसली बघताय लगेच ‘ स्थळ ‘ चे अँप डाऊनलोड करा आणि तुमची सगळी चिंता ‘ स्थळ ‘ वर सोपवा. “आपलं समाधान हिच आमच्या योग्यतेची पावती”

Download Sthal Marathi Matrimony App Now

Download the app and create your profile for FREE.
Find your compatible life partner with Sthal Marathi Matrimony

Open chat